Cow Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Subsidy : गाय दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदानाबाबत नवी अपडेट, जाणून घ्या

Subsidy Cow Milk : राज्य सरकारने गाय दुधासाठी ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती दिली.

sandeep Shirguppe

Subsidy For Cow Milk : राज्य सरकारने गाय दुधासाठी ५ रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती दिली. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल, त्यांनी त्यांच्याकडील दुधाळ जनावरांची नोंदणी, अद्यावतीकरण भारत पशुधन पोर्टलवर (NDLM) करण्यासाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. एम. शिंदे यांनी केले आहे.

राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दुध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरीता दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.

सहकारी दूध संघ व खासगी दुध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.५ Fat ८.५ SNF या गूण प्रतिकरीता किमान २७ रुपये प्रतिलिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन अदा करणे बंधनकारक असणार आहे.

त्यानंतर शासनामार्फत ५ रु. प्रतिलिटर बँक खात्यावर थेट वर्ग (DBT) करण्यात यावी, तसेच Fat व SNF ३.५, ८.५ या पेक्षा प्रति पाँईट कमी होणाऱ्या Fat व SNF करीता प्रत्येकी ३० पैसे वजा व प्रति पाँईट वाढीकरीता ३० पैसे वाढ करण्यात यावी असे सागण्यात आले आहे. दरम्यान सरकारने ही योजना दि. ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी ठेवली आहे.

शेतकऱ्यांसाठी खालीलप्रमाणे अटी व शर्ती

राज्यातील सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांनी आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहील. दुध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते, त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी (Ear Tag) लिंक असणे आवश्यक आहे.

योजनेत सहभागी होणाऱ्या शेतक-यांकडील दुधाळ जनावरांची नोंदणी भारत पशुधन पोर्टलवर असणे बंधनकारक राहील. अनुदान परराज्यातुन संकलीत होणा-या दुधास लागू राहणार नाही. अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना लागू राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

Kashmir Cold Weather : हिमवृष्टीने काश्‍मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला

Memorandum of Understanding : दापोली येथील कृषी विद्यापीठाचा ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठाशी करार

Sugar Factory : वेळेत परवाने दिल्याने ३८ कारखान्यांची धुराडी पेटली

Farmer Producer Organizations : ‘एफपीओं’ना बीजोत्पादनात आणा; केंद्राच्या सूचना

SCROLL FOR NEXT