Girish Mahajan Agrowon
ॲग्रो विशेष

Tourism Policy : आठवडाभरात नवीन पर्यटन धोरण

Girish Mahajan : राज्याच्या सहा विभागांत शिवसृष्टीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

Team Agrowon

Jalgaon News : पर्यटन विकासासाठी सरकार सकारात्मक असून, अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्र मागे कसे राहिले, यावर चिंतन करीत नव्याने सर्वसमावेशक पर्यटन धोरण आठवडाभरात मंजूर करण्यात येईल. त्यादृष्टीने राज्याच्या सहा विभागांत शिवसृष्टीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

जळगावातील जिल्हा भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पर्यटन विकासाच्या संदर्भात संभाव्य योजना व प्रकल्पांबाबत आढावा घेताना श्री. महाजन म्हणाले, की पर्यटनाच्या क्षेत्रात कधीकाळी महाराष्ट्र अव्वल होता. मात्र गेल्या काही वर्षांत तो मागे पडला. त्यासंबंधी कारणांवर चिंतन सुरू आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पर्यटन विकास वेगाने व्हावा म्हणून सरकार कार्यरत व कटिबद्ध असून, त्यादृष्टीने कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

चारशे तीर्थक्षेत्रांना ‘ब’ दर्जा

माझ्याकडे पर्यटन विभागाचा कारभार येऊन चार- पाच महिनेच झाले. मात्र या काळातही काही चांगले निर्णय आम्ही घेतले. राज्यातील जवळपास ४०० तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी त्यांना ‘ब’ वर्ग दर्जा दिला असून, त्यांच्या विकास निधीत अडीच पट वाढ करून तो दोन कोटींवरून पाच कोटी करण्यात आला आहे. आपल्या श्रीक्षेत्र पद्मालय, पाळधी येथील साईबाबा मंदिराचाही त्यात समावेश आहे.

‘लवकरच नवे पर्यटन धोरण’

महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. हे क्षेत्र तसेच ज्या ठिकाणी पाण्याचे मोठे स्रोत आहेत, अशी धरणे, तलाव व अन्य ठिकाणांचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करायचा आहे. जी ऐतिहासिक, प्राचीन स्थळे आहेत त्या सर्वांच्या विकासासाठी राज्यात नवे पर्यटन धोरण लवकरच म्हणजे पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात येईल, असेही श्री. महाजन यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT