Nashik Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Red Onion : नवीन खरीप लाल कांद्याची नाशिकमध्ये आवक सुरू ; मुहूर्ताला २,४३० रुपये दर

Kharif Red Onion Started in Nashik : आता विंचूर उपबाजारांत नवीन खरीप लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यास मुहूर्ताला प्रतिक्विंटल २,४३० रुपये दर मिळत आहे.

मुकुंद पिंगळे

Nashik Onion News : पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा आगाप व नियमित खरीप कांदा लागवडी अपेक्षित प्रमाणात होऊ शकल्या नाहीत. मात्र असे प्रतिकूल चित्र असतानाही काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठा व सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करून कांदा लागवडी केल्या.

सध्या सिन्नर, सटाणा, देवळा तालुक्यांत तुरळक कांदा काढणी सुरू आहे. त्यानुसार देवळा, उमराणे तर आता विंचूर उपबाजारांत नगण्य प्रमाणात आवक सुरू झाली आहे. त्यास मुहूर्ताला प्रतिक्विंटल २,४३० रुपये दर मिळत आहे.

जिल्ह्यात खरीप कांद्याचे सरासरी लागवड क्षेत्र २० हजार ५८४ हेक्टर आहे. मात्र प्रत्यक्षात यंदा १६ हजार ३०० हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. मागीलवर्षी २०२२-२३ मध्ये २४ हजार १८९ हेक्टर लागवड होती. त्यामुळे यंदा लागवडीत मोठी तफावत आहे. त्यातच वाढीच्या अवस्थेत पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने अपेक्षित उत्पादकता व गुणवत्ता मिळालेली नाही. त्यानुसार काढणी होऊन आता गेल्या सप्ताहापासून आवक सुरू झाली आहे.

उमराणे बाजार समितीत गेल्या सप्ताहात तीन वाहनांतून ६० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २,४३० रुपये दर मिळाला. खरीप पोळ व लेट खरीप रांगडा लाल कांदा आवकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजारात खरीप लाल कांदा विक्रीसाठी दाखल झाला आहे. दसरा सणानंतर कांदा बाजारात येतो.

मात्र यंदा १० दिवस अगोदर आवक झाली. मंगळवारी (ता. १०) विंचूर बाजार समितीत आवक झाल्यानंतर असोसिऐशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी लाल कांद्याचे पूजन केले. त्यास प्रतिक्विंटल २१२१ रुपये दर मिळाला.

आवक अत्यल्प; गुणवत्तेचा अभाव

कमी झालेला पाऊस व लागवडीपश्‍चात पावसाचा मोठा खंड यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान आहे. परिणामी चांदवड, देवळा, नांदगाव, येवला, सिन्नर व सटाणा तालुक्यांतील लागवडी घटल्याची एकंदरीत स्थिती आहे. पावसामुळे कांद्याची अपेक्षित उत्पादकता आली नाही. त्यासह पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणी सुरू केली; मात्र आकार, रंग यामध्ये प्रतवारीत अभाव आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Sowing: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात पेरणी सुरू

Irrigation Water Crisis: इंदापुरात शेतकरी पाण्यासाठी आक्रमक

Wildlife Conservation: पाच एकर शेती वन्यजीवांसाठी राखीव

Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान

Farm Loan Waiver: कर्जमुक्ती नव्हे, कर्जवसुली योजना

SCROLL FOR NEXT