Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance: पीकविमा पद्धतीत नवा बदल शेतकऱ्यांना तोट्याचा

Farmers Rights: पीकविमा पद्धतीत नव्याने झालेला बदल शेतकऱ्यांना तोट्याचा असल्याचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते तथा राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar: पीकविमा पद्धतीत नव्याने झालेला बदल शेतकऱ्यांना तोट्याचा असल्याचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते तथा राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील गावकऱ्यांशी सोमवारी (ता. ९ ) ‘क्या हुआ तेरा वादा’ या जन आंदोलनाअंतर्गत दानवे यांनी चर्चा केली. ते म्हणाले, की महायुती सरकार सातत्याने शेतकऱ्यांवर अन्याय करत असून जुलमी धोरण राबवित आहे. ‘एक रुपयात पीकविमा’ योजनेची घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली.

ती योजना आता बंद केली असून, विमा कंपन्यांनी दीड लाख कोटींपेक्षा जास्त प्रीमियम गोळा करून ५० हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम स्वतःच्या खिशात घातली आहे. मात्र, शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई सोडाच, साधे पंचनामेही झाले नाहीत. ४५ हजार गावांमध्ये पाणंद रस्ते देण्याची घोषणा कागदावरच राहिली.

शेतकऱ्यांचे हाल अजूनही तसेच आहेत, कारण आश्वासनांची पूर्तता कधी होणार हे कुणालाच माहीत नाही, असे ते म्हणाले. ‘अन्नदाता बनेल ऊर्जादाता’ ही योजना निव्वळ धूळफेक आहे. आजही अनेक शेतकरी लोडशेडिंगने त्रस्त आहेत. सबसिडीचे आकडे मोठे असले तरी ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत आणि ‘ऊर्जादाता’ बनण्याऐवजी ‘अन्नदाता’ आजही अंधारातच आहे.

‘हर घर जल, हर घर छत’ या योजनांच्या माध्यमातून मोठी स्वप्ने दाखवली खरी, पण अंमलबजावणीतील त्रुटी, भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुळे जनतेची घोर निराशा झाली आहे. घोषणा करून दिशाभूल करण्याऐवजी, सरकारने या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा हे केवळ ‘जुमले’ ठरतील अशी भीती दानवे यांनी व्यक्त केली.

तालुकाप्रमुख राजू वरकड, अनिल चोरडिया, गणेश अधाने, तालुका उपप्रमुख अविराज निकम, अप्पाराव नलावडे, मोहन चदवाडे, संदीप गायकवाड, कृष्णा घुले, विजय चव्हाण, बाळू खुटे, नानासाहेब चव्हाण, किशोर काळे व कडुबा काळे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT