Agriculture Education Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Education : नवे कृषी शिक्षण शेतकरी व्यवसायाला प्रतिष्ठा देणार

Suraj Pandhare: विद्यार्थ्यांमध्ये शेतीशिवाराविषयी शास्त्रोक्त गोडी निर्माण व्हावी तसेच शेतकरी व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट राहील,’’ असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.

Team Agrowon

Pune News : ‘‘शालेय शिक्षणात कृषी विषयाचा झालेला समावेश केवळ पुस्तकी राहणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये शेतीशिवाराविषयी शास्त्रोक्त गोडी निर्माण व्हावी तसेच शेतकरी व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट राहील,’’ असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.

शिक्षणात कृषी विषयाचा समावेश असावा, अशी जुनी मागणी होती. त्यामुळे अलीकडेच राज्य शासनाने तसा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे. परंतु नेमका कशा पद्धतीने कृषी विषय विद्यार्थ्यांमध्ये न्यायचा, हा विषय रंजक व उपयुक्त कसा होईल,

या दृष्टीने सध्या तयारी सुरू आहे. यासाठी शिक्षण खात्याने कृषी विभागाची मदत घेतली आहे. या संकल्पनेला प्रत्यक्षात अभ्यासक्रमात आणण्यासाठी नियोजन केले जात आहे.

केंद्र शासनाने नव्या शिक्षण व्यवस्थेत क्रीडा, साहित्य, कला आणि व्यावसायिक शिक्षणास स्थान दिले आहे. त्यानुसार नव्या शिक्षण पद्धतीची बिनचूक चौकट तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यादृष्टीने केंद्र शासनाने चार तज्ज्ञ समित्याही कार्यान्वित केलेल्या आहेत. त्यातील एका समितीत महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाला स्थान दिले आहे.

“नव्या शिक्षण पद्धतीत राज्यातील विद्यार्थ्यांना कृषीपाठोपाठ क्रीडा, कला आणि व्यावसायिक शिक्षण उपलब्ध होईल. त्याचा लाभ ग्रामीण भागातील विशेषतः शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना अधिक होईल,” असे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

नवे शिक्षण पुढील वर्षापासून लागू होणे शक्य दरम्यान, नव्या शिक्षण पद्धतीतील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांसाठी १२६० तासांचे शिक्षण असेल. त्यातील २१० तास अधिकचे असतील. यामध्येच शेती विषयाचाही समावेश राहील. नवी शिक्षण व्यवस्था पुढील वर्षापासून प्रत्यक्ष अभ्यासक्रमात लागू होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी उपयुक्त ठरणारा अभ्यासक्रम, गुणांकन पद्धत निश्‍चित करण्याची कामे सध्या सुरू आहेत. विद्यार्थ्यांना सर्व प्रथम शेतीचा वाफा कसा तयार होतो, यापासून ते कृषिशास्त्र कसे विस्तारत जाते, याचे धडे सोप्या व सुटसुटीत भाषेत देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा आहे.

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषय समाविष्ट करण्याचा निर्णय झालेला आहे. याबाबत कृषी विभागाकडून मिळालेल्या मुद्द्यांचा सध्या अभ्यास सुरू आहे.
सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू दरात सुधारणा, उडीद दर टिकून, बटाटा बाजारात चढ-उतार, पेरू दरात तेजी, चिकू दरात चढ-उतार

Shri Mangal Wheat: ‘श्री मंगल’ गव्हाचा नवा वाण ; हेक्टरी ५२ क्विंटल उत्पादनाची क्षमता

Crop Damage Survey: अहिल्यानगरला साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

Shivraj Singh Chouhan: काँग्रेसच्या सलग पराभवाला कारण कोण? शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा

Monsoon Return: देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती; राज्यात उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT