Neelam Gore Agrowon
ॲग्रो विशेष

Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंचा ठाकरेंना जय महाराष्ट्र !, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा

Team Agrowon

Thackeray VS Shinde : राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे) गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का दिले आहे. विधानसभेतील शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र, विधानपरिषदेतील आमदार ठाकरेंसोबत होते. परंतु काही दिवसांपूर्वी आमदार मनिषा कायंदे यांनी पाठिंबा दिल्यानंतर आता शिवसेनेत विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत उपस्थित होते. आता नीलम गोऱ्हे यांनी शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे.

कोण आहेत नीलम गोऱ्हे?

नीलम गोल्हे या ठाकरे गटाच्या महत्वाच्या नेत्या आहेत. स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यही करतात. महिलांच्या प्रश्नी त्या कायम तत्पर असतात. पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार यावर त्या काम करतात.

त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे उपनेत्याही आहेत. पक्षाची राजकीय भूमिका आजपर्यंत त्या जनतेसमोर मांडत आल्या आहेत. शिवसेनेच्या कोट्यातून २००२ पासून आतापर्यंत विधान परिषदेत संधी मिळाली. सध्या त्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे पदावर कार्यरत आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड केले. त्यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी पाठिंबा दिला होता. विधान परिषदेतील विप्लव बाजोरिया वगळता इतर आमदार ठाकरेंसोबत होते.

दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटातील महिला आघाडीत धुसफूस सुरू झाली. सुषमा अंधारेंना दिले जाणारे महत्त्व अनेकांच्या नाराजीचे कारण बनले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंची साथ सोडल्याने विधान परिषदेतील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले. त्यामुळे आता विधान परिषदेतही विरोधी पक्षनेतेपद गमावण्याची वेळ उद्धव ठाकरे गटावर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT