Group Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Floriculture : फूलशेतीत सामूहिक शेतीचा पॅटर्न राबविण्याची गरज

Group Farming : सजावटीसह धार्मिक तसेच इतर कामातही फुलांचा वापर वाढला आहे. त्यामुळे फुलांच्या मागणीतही वाढ नोंदविण्यात आली आहे.

Team Agrowon

Nagpur News : सजावटीसह धार्मिक तसेच इतर कामातही फुलांचा वापर वाढला आहे. त्यामुळे फुलांच्या मागणीतही वाढ नोंदविण्यात आली आहे. हा विस्तारित बाजार लक्षात घेता शेतकऱ्यांनी फूलपिकांच्या लागवडीवर भर दिला पाहिजे. त्याकरिता सामूहिक शेतीचा पॅटर्न राबवावा त्यासोबतच बाजारात मागणी असलेल्या फुलांच्या लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी केले.

महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गंत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे व प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्‍त सहकार्याने फूलपिके-उत्तम कृषी कार्यपद्धती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून श्री. तोटावार बोलत होते.

मॅग्नेट नागपूरचे प्रकल्प उपसंचालक अजय कडू, आत्मा प्रकल्प संचालक डॉ. अर्चना कडू, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, उपसंचालक पल्लवी तलमले, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप यांची या वेळी उपस्थिती होती. शंकर तोटावार यांनी अशा कार्यशाळांमधून संबंधित पिकाविषयीची तांत्रिक माहिती मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारपेठेसह तंत्रज्ञान माहिती व्हावे याकरिता अशा कार्यशाळांमध्ये सहभाग वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्‍त केली.

अजय कडू यांनी नागपूर जिल्ह्यात फूलशेतीला वाव असल्याचे सांगत क्‍लस्टर बेस याप्रमाणे त्यासाठी पुढे आले पाहिजे, असे सांगितले. रवींद्र मनोहरे यांनी देखील या वेळी मार्गदर्शन केले. मॅग्नेटचे ओमप्रकाश सुखदेवे, सुमेध कांबळे, दीपक बेदरकर यांच्यासह डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पुष्पशास्त्र विभागाचे डॉ. नितीन गुप्ता यांनी ही या वेळी शेतकऱ्यांना लागवड ते काढणी आणि बाजारपेठ या विषयावर तांत्रिक माहिती दिली.

फूलशेती करण्यास इच्छुक शेतकऱ्यांना बाजारपेठेबाबत माहिती व्हावी याकरिता महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत नरनवरे, मनोहर वानखेडे, नारायण सातपुते, मंगेश खवसे यांनी माहिती दिली. हेमंत जगताप यांनी सहकार विकास महामंडळाला नागपूर विभागामध्ये फूलपीक प्रशिक्षण घेण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

येत्या काळात सहकार विकास महामंडळामार्फत विविध कार्यशाळांचे आयोजन नागपुरात होईल, असा विश्‍वासही व्यक्‍त केला. कार्यशाळेला २५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. सूत्रसंचालन हेमंत जगताप यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heat Wave: विदर्भात उष्णतेची लाट; विदर्भात शनिवारपासून काही भागात वादळी पावसाचा अंदाज

सोनसवाडी शिवार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करा

Jalna Nanded Highway: जालना-नांदेड महामार्गाचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा

Bacchu Kadu Joins Shiv Sena: बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर

Soytbean Rate: सोयाबीनचा ६ हजारांचा टप्पा पार

SCROLL FOR NEXT