Cotton Krushi Melava Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Agriculture Technology : ‘कापूस पिकासाठी यांत्रिकीकरण काळाची गरज’

Technology of Mechanism Fountain : विशेष कापूस प्रकल्पांतर्गत कापूस पीक उत्पादक प्रयोगशील शेतकऱ्यांचा अनुभव व शास्त्रज्ञ संवाद यादृष्टीने कारंजा येथे कापूस पीक कृषी मेळावा घेण्यात आला.

Team Agrowon

Washim News : कृषी विज्ञान केंद्राद्वारे विशेष कापूस पीक प्रकल्पातंर्गत क्षेत्रीय वातावरण अनुकूल पद्धतीतून कापूस अतिघनता लागवड व यांत्रिकीकरण या पर्यायी तंत्राने अधिक उत्पादकतेसाठी काम केले जात आहे. या विशेष कापूस प्रकल्पांतर्गत कापूस पीक उत्पादक प्रयोगशील शेतकऱ्यांचा अनुभव व शास्त्रज्ञ संवाद यादृष्टीने कारंजा येथे कापूस पीक कृषी मेळावा घेण्यात आला.

कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे होते. तर, अध्यक्ष म्हणून विशेष कापूस प्रकल्प प्रमुख डॉ. अर्जुन तायडे यांची उपस्थिती होती. मार्गदर्शक म्हणून जैवतंत्र शास्त्रज्ञ तथा विशेष कापूस प्रकल्प अधिकारी राकेश कुमार, कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ अधिकारी डॉ. एस. के. देशमुख, आर. एस. डवरे, टी. एस. देशमुख व शुभांगी वाटाणे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी रवींद्र जटाले, गौरव मानकर व श्री. चवरे, श्रीकृष्णा बावस्कर उपस्थित होते.

प्रास्ताविकात टी. एस. देशमुख यांनी शेतकऱ्यांना कापूस प्रकल्पातील अतिघनता व्यवस्थापनाचा उद्देश व स्थितीबाबत माहिती दिली. डॉ. काळे यांनी शेतकऱ्यांना कापूस पिकाच्या प्रकल्पातील विविध तांत्रिक उपक्रमांचे महत्त्व सांगून केव्हीकेद्वारे राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. तांत्रिक सत्रात आर. एस. डवरे यांनी एकात्मिक कापूस पीकसंरक्षण तंत्र विषयावर मार्गदर्शन केले.

श्री. जटाले यांनी शेतकरी हिताच्या प्रोत्साहक योजना सांगितल्या. गौरव मानकर यांनी कपाशी संशोधित वाणांची माहिती दिली. वाटाणे यांनी शेतीमधील श्रम कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. डॉ. तायडे यांनी कापूस प्रकल्पाची मांडणी व संशोधन कार्याचे महत्त्व सांगत कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी सघन कापूस लागवड तंत्रज्ञान फायदेशीर असून कापूस पिकासाठी यांत्रिकीकरण काळाची गरज असल्याचे सांगितले.

श्री. राकेशकुमार यांनी कापूस पीक शेती आणि प्रात्यक्षिक निरीक्षक म्हणून आलेला तांत्रिक अनुभव सांगत बीटी कापूस तंत्राचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगितले. प्रयोगशील शेतकरी प्रदीप ठोकळ (वडवी), रमेश देशमुख (सोहोळ) यांनी कापूसशेती व प्रकल्प तंत्राबाबत माहिती दिली. श्रीकृष्ण बावस्कर, अक्षय गिरी, शिवाजी वाघ व आदित्य देशमुख यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. डॉ. एस. के. देशमुख यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT