Crop Damage Help agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Help : पिकाच्या नुकसानीची मदत हवीय, पीक विमा सोडून याठिकाणी मिळू शकते मदत

Crop Insurance : राज्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Farming News : महाराष्ट्रात खरिपाच्या पेरणीवेळी पावसाने दडी मारल्याने हजारो हेक्टरवरील शेती पिकांविना वाया गेली तर काही ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. तर हातातोंडाशी आलेल्या पिकांवर रोगाचा आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसल्याने शेती वाया जाण्याची वेळ आली आहे. दरम्यान राज्यात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.

याचबरोबर राज्यातील बऱ्याच भागात काही पिके अधिसूचित केलेली नसतानाही (विमा यादीत नसलेली पिके) मोठ्या प्रमाणावर लागवड होते. अशावेळी पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची वेळ येते. अधिसूचित नसलेल्या पिकासाठी पीक विम्याची रक्कम किंवा शासकीय मदत मिळवता येते. ही मदत कशी मिळवायची हे शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे.

दरम्यान नुकसान ग्रस्त पिकाला मदत मिळवायचे असेल तर जर एखाद्या भागात संबंधित पीक अधिसूचित केलेले नसेल तर पीक विमा युनिटकडून राज्याला किंवा त्या महसूल मंडळाला संबंधित भागामध्ये प्रस्ताव द्यावा लागतो. याचबरोबर मागच्या तीन वर्षामध्ये अडीच हजार ते तीन हजार हेक्टरवर लागवड केलेली असावी लागते.

महसूल मंडळाला दिलेला प्रस्ताव तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर जातो व त्यानंतर राज्याच्या कृषी विभागाकडून ते पीक विम्यासाठी अधिसूचित केले जाते.

जर पीक अधिसूचित केलेले नसेल आणि त्या भागातील पिकाचे आपत्तीमुळे नुकसान झाले असेल तर त्यासंदर्भात संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश द्यावे लागतात.

त्यानंतर गावपातळीवरील कमिटी या संदर्भातील पंचनामे करते. या कमिटीमध्ये शेतकरी, सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, कृषी अधिकारी अशा लोकांचा समावेश असतो.

या पंचनाम्याचा अहवाल महसूल विभागाकडे गेल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून या शेतकऱ्यांना मदत मिळते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT