Agriculture News  Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : हमखास उत्पादन देणाऱ्या व्यावसायिक पिकांची गरज

Indian Agriculture : जागतिक हवामान बदलाचे दृश्य परिणाम शेती व्यवसायावर दिसत असून प्रत्येक हंगामात हाताशी आलेल्या नगदी पिकाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Team Agrowon

Akola News : जागतिक हवामान बदलाचे दृश्य परिणाम शेती व्यवसायावर दिसत असून प्रत्येक हंगामात हाताशी आलेल्या नगदी पिकाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हंगामी पिकांना जोडीदार म्हणून पर्यायी औषधी सुगंधी वनस्पतीसारख्या व्यावसायिक पिकांची लागवड करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी केले.

अखिल भारतीय समन्वयित औषधी व सुगंधी वनस्पती आणि पानवेली संशोधन प्रकल्प, नागार्जुन वनौषधी उद्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्टातील कृषी विभागातील कृषी अधिकाऱ्यांसाठी औषधी व सुगंधी वनस्पती या विषयावर पाच दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आता औषधी व सुगंधी वनस्पतीची लागवड पीक विविधिकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून कृषी अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांमध्ये या पिकांचा प्रसार करावा तसेच औषधी व सुगंधी वनस्पतींना पीक विविधतेच्या दृष्टीने स्थान द्यावे असे सांगितले. शुक्रवार (ता. १५) पर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षणात ४० कृषी अधिकारी सहभागी झाले आहेत.

प्रशिक्षणामध्ये औषधी व सुगंधी वनस्पती ओळख, त्यांचे संवर्धन, औषधी गुणधर्म, उपयोग, लागवड तंत्रज्ञान, आंतरपीक पद्धती, सेंद्रीय शेतीमध्ये व एकात्मिक शेती पद्धतीमध्ये समावेश, रोग व्यवस्थापन आणि विपणन विषयावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर भेटी तसेच औषधी वनस्पती लागवड करणारे शेतकरी यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट आयोजित करण्यात आली.

उद्घाटन सत्राला वनामती (नागपूर)च्या प्रशिक्षण समन्वयक सीमा मुंडले लांबट, माजी सहयोगी संशोधन संचालक डॉ. संजय वानखडे, डॉ. आदिनाथ पसलावार, डॉ. जयंत देशमुख, प्रमुख, डॉ. योगेश इंगळे, डॉ. भाग्यश्री पाटील, डॉ. नितीन पतके, डॉ. अमित देशमुख व डॉ. मनीष वाकोडे, डॉ. बालकिशोर मुराडी, अश्विनी सातपुते, आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT