Humani Agrowon
ॲग्रो विशेष

Humani Pest : हुमणी नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी हुमणीला समूळ नष्ट करावे लागेल. हुमणी नियंत्रणासाठी सामूहिकपणे प्रकाश सापळे लावणे गरजेचे आहे. सापळे लावले नाही तर मोठ्या नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल, असे मत कृषी सहायक सुप्रिया झरकर यांनी व्यक्त केले आहे.

कृषी विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्र भिगवण यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीपार्धी (ता. दौंड) येथे खरीप हंगाम पूर्व प्रमुख पिकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी झरकर बोलत होत्या.

हुमणी किडीची ओळख, किडीची अवस्था, नुकसानीचा प्रकार, करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. मका बियाण्यास ऍझोटोबॅक्‍टर व पीएसबी या जिवाणू खतांची व ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची फवारणी करूनच मगच शेतात पेरणी करावी अशी माहिती देण्यात आली.

बीज उगवण क्षमता चाचणी, माती परीक्षण प्रशिक्षण, ऊस पिकाबाबत मार्गदर्शन, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना व इतर शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात आली.

या वेळी बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण विकास केंद्राचे निकम, जी. टी. कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॅा. यशवंत खताळ, ग्रामपंचायत सदस्य शेखर सोडनवर, प्रगतशील शेतकरी मारुती महाडिक, दिलीप थोरात, दशरथ दिवेकर उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT