Nayab Singh Saini Oath Ceremony Agrowon
ॲग्रो विशेष

Nayab Singh Saini Oath Ceremony : हरियाणात दुसऱ्यांदा नायब सिंग सैनी राज!, सैनी झाले हरियाणाचे मुख्यमंत्री

Aslam Abdul Shanedivan

Pune News : हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरच्या निवडणूकांचा निकाल काहीच दिवसांपूर्वी आला. येथे हरियाणात भाजपला चांगेल यश मिळाले असून गुरूवारी (ता. १७) नायब सिंग सैनी यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. बुधवारी (ता.१६) झालेल्या भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नायब सैनी यांची एकमताने नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर आता सैनी यांचा हरियाच्या पंचकुला येथे शपथविधी पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.

हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरच्या निवडणूकांचा निकाल काहीच दिवसांपूर्वी आला. यावेळी जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपला यश मिळवता आले नाही. तेथे कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला सर्वाधिक ४२ जागा मिळाल्या. तर ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी (ता.१६) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर हरियाणात भाजपने जादू दाखवत तिसऱ्यांदा सत्ता संपादन केली. यावेळी नायब सिंग सैनी यांनी हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका पार पाडली. याचेच बक्षीस म्हणून भाजप केंद्रीय नेतृत्वाने सैनी यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची माळ टाकली.

हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नायब सैनी यांच्यासह यावेळी १३ मंत्र्यांनीही शपथ घेतली. सैनी यांना हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.

यांनी देखील घेतली मंत्रीपदाची शपथ

कृष्णा पनवार, गौरव गौतम, अनिल विज, महिपाल धांडा, श्रुती चौधरी, विपुल गोयल, राव नरबीर, कृष्णा बेदी, आरती राव, श्याम सिंह राणा, डॉ. अरविंद शर्मा आणि राजेश नागर यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला ४८ तर काँग्रेसला केवळ ३७ जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार हरियणात भाजपला संधी मिळणार नसून काँग्रेस सरकार स्थापन करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र नायब सिंग सैनी यांनी आपल्या रणनीतीने सर्व पोल खोटे ठरवत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान ईव्हीएममधील बिघाडाचे कारण देत हरियाणाच्या २० विधानसभा जागांसाठी फेरनिवडणुकीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ती नामंजूर करत थेट न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकीलांना सुनावले. ही सुनावणी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर झाली. यावेळी न्यायालयाने, निवडून आलेल्या सरकारच्या शपथविधीवर बंदी घालावी अशी याचिकाकर्त्याची मागणी आहे का असा सवाल करत? आम्ही तुम्हाला दंड देखील करू शकतो. पण नाही. याबाबत काही अक्षेप असेल तर आधी तक्रार निवडणूक आयोगाकडे द्या. यानंतर आम्ही विचार करू, असे म्हटले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Soybean Market : सोयाबीनच्या ‘शेतीमाल तारण’ला ओलाव्याची अडचण

Crop loan Distribution : रब्बीसाठी पीक कर्जवितरण आढावा बैठकच नाही

Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन नरमले; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आले दर?

Flood Damage Compensation : २०२० चा पीक विमा बीड जिल्ह्याला मिळालाच नाही; खंडपीठाचे राज्य शासनासह बीडचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचा आदेश

SCROLL FOR NEXT