Sugarcane Crushing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Subsidy : उसास ‘नॅचरल शुगर’ देणार शंभर रुपये विशेष अनुदान

Sugarcane Crushing : नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणीच्या वतीने आजअखेर ३.२६ लाख टन गाळप केले आहे.

Team Agrowon

Dharashiv News : नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. रांजणीच्या वतीने आजअखेर ३.२६ लाख टन गाळप केले आहे. चालू गळीत हंगामात गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एक फेब्रुवारीपासून कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या उसास या वर्षीचे अंतिम ऊस दरापेक्षा शंभर रुपये प्रतिटन विशेष अनुदान स्वरूपात जादा देणार असल्याची माहिती नॅचरल शुगरचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली.

कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा सर्व ऊस पुरवठादारांचे अभिनंदन करून चालू गळीत हंगामामध्ये हंगाम सुरुवातीस ठरवलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ऊस पूरवठादार शेतकऱ्यांनी सहकार्य करावे आणि गाळपाची उद्दिष्टपूर्ती होईल यादृष्टिने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस नॅचरल शुगरलाच देऊन सहकार्य करावे, असे आवाहन श्री. ठोंबरे यांनी केले.

तसेच नॅचरल शुगरने उत्पादित केलेल्या ‘नॅचलर ऑरगॅनिक फर्टिलायझर’ या ऊस पिकासाठी परिपूर्ण असलेल्या सेंद्रिय खताचा, खास सवलतीचा दर ३०० रुपये प्रति पोतेच्या दरामध्ये ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांना कारखाना यावर्षी पुरवठा करत आहे.

या संधीचा जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ‘नॅचरल ऑरगॅनिक फर्टिलायझर’ हे सेंद्रिय खत खरेदी करून ऊस पिकास वापरून प्रतिएकरी उसाचे उत्पादन वाढवावे.

आपला ऊस उत्कृष्ट दर्जाचा आणि टनेज वाढवून उसाचे विक्रमी उत्पादन शेतामध्ये घ्यावयाचे असेल तर वरील सेंद्रिय खत नॅचरल शुगरचे ऊस विकास विभागाच्या सल्ल्यानुसार ऊस पिकास देऊन उत्पादन वाढवावे, असे आवाहनही श्री. ठोंबरे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT