Sugarcane Crushing Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : ‘नॅचरल शुगर’कडून गळीत हंगामात ४ लाख ७१ हजार टन उसाचे गाळप

Sugarcane Season : नॅचरल उद्योग समूहाच्या २३ व्या गळीत हंगामात ४ लाख ७१ हजार टन उसाचे गाळप करण्यात आले. तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे यांच्या हस्ते गव्हाण पूजन करून शनिवारी (ता. २२) गळीत हंगामाची सांगता करण्यात आली.

Team Agrowon

Dharashiv News : नॅचरल उद्योग समूहाच्या २३ व्या गळीत हंगामात ४ लाख ७१ हजार टन उसाचे गाळप करण्यात आले. तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे यांच्या हस्ते गव्हाण पूजन करून शनिवारी (ता. २२) गळीत हंगामाची सांगता करण्यात आली.

कारखान्याने या गळीत हंगामात कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे तसेच गेटकेन ऊस मिळवून गाळप यशस्वीरित्या पूर्ण केले. तसेच ४ लाख ३८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले. मागील वर्षी मराठवाडयात दुष्काळी परिस्थितीमुळे मांजराधरण भरलेले नसल्याने मागील वर्षी नवीन ऊस लागवड अत्यल्प झाल्याने चालू गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता फारच कमी झाली.

त्यामुळे यावर्षी अपेक्षित ऊस गाळप झाले नसले तरी गाळपाचे योग्य नियोजन करून नॅचरल शुगरने २००० पासून प्रत्येक वर्षी ऊस विकासासारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून साखर उद्योगामध्ये नव नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. पाऊसमान कमी असतानाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आहे.

त्या उपलब्ध पाण्याचा ठिबकद्वारे ऊस पिकासाठी कमीत कमी वापर करून ऊसपीक जोमात उभे केले आणि तो संपूर्ण ऊस कारखान्यासाठी दिला. त्यामुळेच दुष्काळी परिस्थितीतही चार लाख टन ऊस गाळप झाले.

कारखान्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन, शिस्तबद्ध पद्धतीने कामकाज करून आव्हानात्मक गाळप हंगाम पूर्ण केल्याचे तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे यांनी सांगितले. या गळीत हंगाम सांगता कार्यक्रमास कारखान्याचे संचालक, प्रवर्तक, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, मोठया संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT