Cotton Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Productivity : सुधारित वाण-तंत्रज्ञानातून कापूस उत्पादकतावाढ साधणार

Hybrid Cotton Seeds: कापूस उत्पादकतावाढ हे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे. त्याकरिता देशाच्या विविध भागांत पूरक संशोधनावर भर दिला जाईल.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : कापूस उत्पादकता वाढविण्याकरिता सुधारित संकरित वाण विभागनिहाय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याबरोबरच गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी देशभरातील संस्थांच्या सहकार्यातून काम होईल, असा विश्‍वास केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे नवनियुक्‍त संचालक डॉ. विजय वाघमारे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्‍त केला.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपुष्टात आला. त्यामुळे त्यांच्या जागेवर कोणाची नियुक्‍ती होणार याविषयी चर्चा रंगल्या असतानाच डॉ. विजय वाघमारे यांच्या नियुक्‍तीने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

शुक्रवारी (ता. ४) त्यांनी प्रभारी संचालक डॉ. जी. टी. बेहरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्यानंतर ‘ॲग्रोवन’शी बोलताना डॉ. वाघमारे म्हणाले, ‘‘कापूस उत्पादकतावाढ हे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे. त्याकरिता देशाच्या विविध भागांत पूरक संशोधनावर भर दिला जाईल. त्याआधारे विभागनिहाय सुधारीत, संकरित वाणांची उपलब्धता करून देण्यावर भर राहणार आहे.

कापसात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्याचाही उत्पादकतेवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण आहे. देशातील काही संस्थांनी गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाचा उद्देश साधला आहे. त्यांच्यासोबत सहकार्यातून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर भर राहील.

तीन वर्षे सांभाळला प्रभार

संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. केशव क्रांती यांनी २०१७ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. दरम्यान सुरुवातीचे सहा महिने कापूस संशोधन संचालकाचा प्रभार लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे तत्कालीन संचालक डॉ. मिलिंद लदानिया यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर २०१७ ते २० या तीन वर्षांच्या कालावधीत प्रभारी संचालक म्हणून डॉ. विजय वाघमारे यांनी कामकाज पाहिले. त्यामुळे त्यांना संचालकपदाचा पूर्वीचाच अनुभव असल्याने त्यांच्याकडून कापूस उत्पादकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

देशात कापूस हे मुख्य पीक ठरते. त्यामुळेच या पिकात उत्पादकता वाढीच्या अनुषंगाने विशेष प्रयत्न होतील. त्याकरिता सुधारित तंत्रज्ञानाची उपलब्धता कशी होईल यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणाच्या दृष्टीनेही संशोधनात्मक कामावर भर राहणार आहे.
- डॉ. विजय वाघमारे, संचालक, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT