Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Rain Damage: वादळी वारे, मॉन्सूनपूर्व पाऊस, गारपिटीने नाशिकमध्ये दाणादाण

Farmer Crop Loss: नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने आणि गारपिटीने कांदा, आंबा, डाळिंब व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान केले आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News: नाशिक जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. मंगळवारी (ता. ६) दुपारनंतर निफाड, चांदवड, सिन्नर, नांदगाव, येवला, मालेगाव, कळवण, बागलाण, देवळा, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा व दिंडोरी या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह मॉन्सूपूर्व पाऊस आणि गारपिटीमुळे दाणादाण उडाली. प्रामुख्याने कांदा, आंबा, डाळिंब बागांसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

सध्या शेतकऱ्यांची कांदा काढण्याची लगबग सुरू होती. वादळी वाऱ्यासह अचानक आलेला पाऊस व गारपिटीने कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान केले. अनेक ठिकाणी झाकलेल्या कांद्याच्या पोळीवरील प्लॅस्टिकचे आच्छादने, घरांचे पत्रे हवेने उडून मोठे नुकसान झाले

अनेक ठिकाणी कांदा काढणी, साठवणूक तर कांदा बीजोत्पादन क्षेत्रात डेंगळे तोडणी सुरू होती; मात्र वादळी वारे, गारपिटीने नुकसान वाढले. साठवलेला चारा भिजला तर काही चारा वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कांदा, आंब्याचे नुकसान

वादळी वाऱ्यासह पावसामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, दिंडोरी, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर या तालुक्यांत नुकसान वाढल्याचे समोर आले. तर सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांत आंब्याला मोठा फटका बसला. तसेच मालेगाव, सटाणा व चांदवड तालुक्यांत डाळिंब बागांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT