Nashik News : वाढत्या तापमानासह दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी भीषण पाणीटंचाई आहे. गेल्या १० दिवसांपूर्वी जिल्ह्यात २२ टँकर सुरू होते.तर आता ही संख्या गुरुवार (ता. २४) रोजी ७४ वर गेली आहे.
येवल्यात टँकरची संख्या दुपटीने वाढली असून येथे जिल्ह्यात सर्वाधिक ५१ फेऱ्या सुरू आहेत. जिल्ह्यात पारा ४० अंशावर गेला आहे. तापमानात वाढ झाली असून अनेक ठिकाणी बाष्पीभवनामुळे जलस्रोत आटत आहेत.
तर भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाल्याने ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर ओढावली आहे. उष्णतेची दाहकता वाढत असून एप्रिलअखेरपर्यंत टँकर वाढत जातील अशी स्थिती आहे.
सद्यः स्थितीत जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील ७७ गावे व १५५ वाड्यांवरील १ लाख ३८ हजार ९२३ इतक्या लोकसंख्येची तहान टँकरद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या साहाय्याने भागविली जात आहे. यात येवल्यात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवत आहे. दहा दिवसांत तब्बल २० टँकर वाढले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण टँकरची संख्या २९ वर पोहोचली आहे. याशिवाय धरणांचा ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात १६ टँकर संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
नांदगावला ९ तर मालेगाव तालुक्यात ८ टँकर सुरू आहेत. चांदवड, पेठ, सुरगाणा, सिन्नर व देवळा तालुक्यात टँकर सुरू आहेत. तर बागलाण, दिंडोरी, कळवण, नाशिक, निफाड व त्र्यंबक तालुक्यात अद्याप टँकर सुरू नाहीत. येणाऱ्या काळात पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.
...अशी आहे स्थिती
जिल्ह्यात सध्या ७४ टँकर सुरू
७७ गावे, १५५ वाड्यांना पाणीपुरवठा
दिवसभरात टँकरच्या १५७ फेऱ्या
येवल्यात सर्वाधिक ७२ गावे-वाड्या तहानलेल्या
टँकरसाठी २७ विहिरी अधिग्रहीत
तालुका गावे/वाडी टँकर संख्या मंजूर फेऱ्या
येवला ७२ २९ ५१
इगतपुरी ६१ १६ ३६
नांदगाव ३८ ९ २४
मालेगाव १८ ८ १५
सिन्नर २३ ४ १७
सुरगाणा ४ ३ ७
चांदवड २ २ २
पेठ २ २ १
सुरगाणा ४ ३ ७
एकूण २३२ ७४ १५७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.