Silk Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Farming : रेशीम हब’ म्हणून होणार नाशिक जिल्ह्याची ओळख

Nashik Silk Hub : गोरक्ष गाडीलकर : जाधव यांच्या रेशीम उद्योगाला भेट

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik News : नाशिक ः ‘‘जिल्ह्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेतीचा पर्याय शेतकऱ्यांनी निवडला आहे. त्यातून नव्या संधी तयार होतील. जिल्ह्यात कोष, धागा व येवला येथे पैठणी तयार होते. त्यामुळे रेशीम शेतीची मूल्यसाखळी तयार होण्याच्या संधी आहेत.

यातूनच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल व इतरांच्या रोजगार निर्मितीला चालना मिळेल. भविष्यात नाशिक जिल्हा ‘रेशीम हब’ म्हणून ओळखला जाईल,’’ असे प्रतिपादन राज्य रेशीम संचालनालयाचे संचालक गोरक्ष गाडीलकर यांनी केले.

कृष्णनगर (ता. इगतपुरी) येथील शेतकरी सखाहरी कचरू जाधव यांच्या रेशीम उद्योग व चॉकी सेंटरला गाडीलकर यांनी नुकतीच भेट दिली. जिल्हा रेशीम अधिकारी पी. व्ही. इंगळे, क्षेत्र सहाय्यक जे. के. पाटील आदी उपस्थित होते. गाडीलकर यांनी रेशीम शेतीतील उल्लेखनीय कामाबद्दल जाधव यांचे कौतुक केले.

कृष्णनगर येथे बाल्य कीटक संगोपन केंद्र (चॉकी सेंटर) सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार उपस्थित मान्यवरांनी निर्णयक्षमता, वेळ, व्यवस्थापन, कौशल्य, आंतरराष्ट्रीय व्यापार, अर्थकारणाबाबत मार्गदर्शन केले.

जाधव हे पूर्वी भाजीपाला शेती करायचे. मात्र वाढता उत्पादन खर्च, मजूर टंचाई व अस्थिर बाजारपेठ या प्रमुख कारणांनी शेती तोट्यात होती. त्यामुळे बदल म्हणून दुग्धव्यवसाय केला; पण त्यातही आर्थिक गणित जुळेना. अखेर रेशीम शेतीचा पर्याय निवडला. ‘‘कधीकाळी अवघे २ लाख रुपयांवर वार्षिक उत्पन्न यायचे.

आता किमान मनुष्यबळात कौटुंबिक पातळीवर व्यवसाय सुरू असून १० लाखांवर उत्पन्न गेले आहे. शास्त्रीय पद्धतीने कामकाज, गुणवत्तापूर्ण रेशीम कोष उत्पादनामुळे पाचपट उत्पन्न वाढले आहे. या व्यवसायाने फक्त पैसाच नाही, तर सन्मान मिळवून दिला,’ असे ते अभिमानाने सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ZP Election Voting: ७ हजार ४३८ उमेदवारांचे भवितव्य 'ईव्हीएम'मध्ये बंद, कुठे किती मतदान?

Radhakrishna Vikhe Patil: आधुनिक तंत्रज्ञानातूनच शेतीचे भविष्य उज्ज्वल : विखे पाटील

Weekly Market Closed: धाराशिवमधील १५ गावांत आज आठवडे बाजार बंद

District Planning Committee: सोलापूर जिल्हा नियोजन समितीची लवकरच बैठक

Local Body Election: बारा लाख मतदार देणार निर्णायक कौल

SCROLL FOR NEXT