Nashik DCC Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik DCC Bank : बड्या नेत्यांचे नातेवाईक नाशिक जिल्हा बँकेच्या रडारवर

Loan Defaulters : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता राजकीय नेत्यांशी संबंधित, बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. राजकीय नेत्यांच्या नातेवाइकांकडे कडक बसली सुरू केली.

Team Agrowon

Nashik News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आता राजकीय नेत्यांशी संबंधित, बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. राजकीय नेत्यांच्या नातेवाइकांकडे कडक बसली सुरू केली. देवळा तालुक्यातील पहिल्या २५ थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध करीत त्यांच्या वसुलीसाठी कंबर कसली आहे. यात खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे बंधू दिलीप पाटील यांच्यासह शिवसेना नेत्यांचा समावेश आहे.

मार्चअखेरच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीसंदर्भात जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलानी यांनी शुक्रवारी (ता. १४) बँकेत बैठक घेतली. बँकचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे, बँकेचे सरव्यवस्थापक रत्नाकर हिरे, वसुली विभागाचे व्यवस्थापक वाटपाडे, देवळा तालुक्याचे उपनिबंधक, विभागीय अधिकारी तसेच सर्व निरीक्षक, गट सचिव उपस्थित होते.

बँकेची थकित रक्कम दोन हजार २०० कोटी रुपयांच्या घरात असून, बँक आर्थिक अडचणीत आली. बँकेवर परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे. परवाना वाचविण्यासाठी मार्चअखेर जवळपास ६०० कोटी रुपये वसुल करावे लागतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही वसुलीवर भर देण्याची सूचना केल्याने त्यादृष्टीने बँक वसुलीच्या कामाला लागली असल्याचे मुलानी यांनी सांगितले.

देवळा तालुक्यात वसुलीचे प्रमाण असमाधानकारक असल्याचे बँकेने बड्या २५ थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. तालुक्यातील एकूण थकबाकीची रक्कम ६२ कोटी ३६ लाख ३९ हजार रुपये असली, तरी प्रत्यक्षात अवघी १० लाख ८५ रुपयेच वसुली झाली आहे. अजून ५० कोटी ८५ हजार ८९ हजार रुपये वसूल होणे बाकी आहे. यात व्याजाचे १० कोटी २१ लाख ६२ हजार रुपये असले, तरी प्रत्यक्षात मात्र ५३ लाख ११ हजार रुपयेच वसूल झाले आहेत.

देवळ्यातील बडे थकबाकीदार

खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचे बंधू दिलीप पाटील यांच्याकडे तब्बल एक कोटी तीन लाख ५४ हजार १८५ रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी १३ वर्षांपासूनची आहे. अन्य थकबाकीदार असे (कंसात रक्कम) : राम मोरे (एक कोटी पाच लाख ९७ हजार), शांताराम गजा जाधव (२९ लाख १८ हजार), यशवंत वाघ(५६ लाख ४१ हजार), रमेश सोनवणे (४७ लाख ५४ हजार), कमळाबाई देवरे (४७ लाख सात हजार), अभिमान ठाकरे (४२ लाख १८ हजार), तुळशीराम शिरसाट (३७ लाख २३ हजार), सुनील देवरे (४५ लाख ९४ हजार).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT