Nashik DCC Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

Nashsik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या २५ संचालकांना सहकार विभागाची नोटीस

Co-Operative Department : सहकार विभागाने नाशिक जिल्हा बँकेच्या २५ संचालकांना १८२ कोटी रुपये वसुलीची नोटीस पाठविली आहे.

Team Agrowon

Nashik News : सहकार विभागाने नाशिक जिल्हा बँकेच्या २५ संचालकांना १८२ कोटी रुपये वसुलीची नोटीस पाठविली आहे. यामध्ये सरकारमधील मंत्री माणिकराव कोकाटे यांसह काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव आणि सत्ताधारी पक्षाच्या विविध आमदारांचा समावेश आहे. राज्य शासनाच्या या कारवाईबाबत राजकारणात खळबळ उडाली आहे.

नाशिक जिल्हा बँकेच्या चौकशीतील कलम ८८ अन्वये झालेले नुकसान संचालकांकडून वसुली करण्याबाबत ही नोटीस या संचालकांना पहिल्यांदाच बजावण्यात आलेली नाही. यापूर्वी देखील अशीच कारवाई झाली आहे. त्यात ७ ते ८ वर्षांचा कालावधी निघून गेला. मात्र कारवाई शून्य आहे.

जिल्हा बँकेच्या या नोटिसबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यापूर्वी तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, त्यानंतर दिलीप वळसे पाटील आणि सध्याचे बाबासाहेब पाटील असे तीन सहकार मंत्री या कालावधीत झाले. या प्रत्येकाने या चौकशीत आणि नोटिसच्या सुनावणीत मोठा कालावधी घेतला. मात्र यातून निष्पन्न काहीच झालेले नाही.

...या संचालकांना नोटिसा

खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सर्वश्री दिलीप बनकर, डॉ. राहुल आहेर, ॲड. राहुल ढिकले तसेच माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार नरेंद्र दराडे, जे. पी. गावित, शिरीषकुमार कोतवाल, वसंत गीते, राजेंद्र भोसले, माणिकराव शिंदे, चंद्रकांत गोगड, राघो अहिरे, सुचेता बच्छाव, दत्ता गायकवाड, नानासाहेब पाटील, राजेंद्र डोखळे, माणिकराव बोरस्ते, धनंजय पवार, वैशाली कदम, गणपतराव पाटील आणि संदीप गुळवे.

चौकशी समितीने ठेवलेला ठपका

नाशिक सहकारी साखर कारखाना, निफाड सहकारी साखर कारखाना, रेणुका यंत्रमाग औद्योगिक संस्था, आर्मस्ट्राँग साखर कारखाना, तसेच म्हेळुस्के विविध कार्यकारी सेवा सोसायटी आदी संस्थांना दिलेल्या कर्ज वितरणात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अडीच वर्षे चौकशी केल्यावर गौतम बलसाने यांनी २९ आजी-माजी संचालक आणि १५ अधिकारी अशा एकूण ४४ जणांवर १८२ कोटींची वसुली निश्चित केली होती. मात्र, सहकार विभागाचे कक्ष अधिकारी सोपान आरोटे यांनी गुरुवारी (ता. २०) यातील २५ संचालकांनाच नोटीस बजावली आहे. २ एप्रिल रोजी मंत्रालयात सुनावणी होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT