Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Supply Nanded : नांदेड जिल्ह्याासठी दोन लाख १६ हजार टन खत पुरवठा मंजूर

Fertilizer Stock : आगामी खरीप हंगामात जिल्ह्याला लागणाऱ्या दोन लाख १६ हजार २८१ मेट्रीक टन रासायनिक खत पुरवठ्याला राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाली आहे.

Team Agrowon

Nanded News : आगामी खरीप हंगामात जिल्ह्याला लागणाऱ्या दोन लाख १६ हजार २८१ मेट्रीक टन रासायनिक खत पुरवठ्याला राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात सध्या विविध ग्रेडचे ९० हजार २९४ टन खत शिल्लक असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांनी दिली.

नांदेड जिल्ह्यात हंगामी पिकांसह बागायती तसेच फळपिकांसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होतो. मागील चार वर्षात दरवर्षी एक लाख ९५ हजार २४६ टन खताचा वापर झाला आहे. या दृष्टीने कृषी विभाग दरवर्षी राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे जिल्ह्याला लागणाऱ्या खताची मागणी करतो. खरीप हंगाम २०२५-२०२६ साठी जिल्ह्याला दोन लाख ३३ हजार ७३५ टन अधिक खताची आवश्यकता भासणार आहे.

तशी मागणी नुकतीच राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. आगामी काळात लागणाऱ्या रासायनिक खताच्या नियोजनाबाबत लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी संबंधितांना नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच शेतकऱ्यांना खरिपापूर्वी खताची टंचाई जाणवणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले.

जिल्ह्याला आगामी खरीप हंगामात लागणाऱ्या रासायनिक खताचा मागणी अहवाल नुकताच राज्याच्या कृषी आयुक्तांकडे सादर झाला आहे. त्यांनी लगेच नांदेडसाठी दोन लाख सोळा हजार २८१ टन खत आवंटनास मंजुरी दिली आहे. या खतात युरिया. डीएपी, एमओपी, एनपीके, एसएसपी या खतांचा समावेश आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा समतोल वापर करण्यासाठी माती परिक्षण करूनच रासायनिक खताचे नियोजन करावे, यासोबत सेंद्रिय, जैविक खतासह कंपोष्ट खताचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत तसेच नांदेड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. निलकुमार ऐतवडे यांनी केले आहे.

जिल्ह्याला लागणारे खत

नांदेड जिल्ह्याचा सरासरी खत वापर एक लाख ९५ हजार २४६ टन आहे. तर आगामी खरिपासाठी कृषी विभागाने दोन लाख ३३ हजार ७३५ टन खताची मागणी केली आहे. कृषी आयुक्तालयाने नांदेडसाठी दोन लाख १६ हजार २८१ टन खतांचे आवंटन मंजूर केले आहे. जिल्ह्यात एकूण साठा ९१ हजार १६८ टन खत शिल्लक होता.

खरिपासाठी ग्रेडनिहाय मंजूर रासायनिक खताचे आवंटन

(खत मेट्रीक टनांत)

खताचा प्रकार मंजूर आवंटन

युरिया ६४,६९९

डीएपी ३१,७८२

एमओपी ०७,०००

एनपीके ८५,१००

एसएसपी २७,७००

एकूण ०२,१६,२८१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT