Agriculture Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Weather : नांदेडला थंडीचा कडाका वाढला

Agriculture Weather Update : नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. मागील आठवड्यात किमान तापमानाचा पारा १९ अंश सेल्सिअसवर होता.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. मागील आठवड्यात किमान तापमानाचा पारा १९ अंश सेल्सिअसवर होता. यात सध्या घट होऊन मंगळवारी तापमानाचा पारा १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. यामुळे सकाळी आणि संध्याकाळी गारवा वाढला आहे. याचा फायदा रब्बीतील गहू तसेच हरभरा पिकाला होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

जिल्ह्यात मागील आठवड्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी कमी होऊन किमान तापमान १९ सेल्सिअसवर पोहोचले होते. तर कमाल तापमानही ३१ अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे थंडी कमी झाली होती. परिणामी हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढला होता. यानंतर मात्र राज्यात थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला होता.

यानुसार नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी (ता. १६) सकाळी तापमानाचा पारा १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कमाल तापमान ३०.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

थंडीचा कडाका वाढल्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या आहेत. तर शेतात रब्बीसाठी पाणी देणारे शेतकरी मात्र या थंडीमुळे गारठून जात आहेत. या थंडीमुळे खरिपातील गहू, हरभरा पिकांची वाढ समाधानकारक होत आहे.

रब्बीमध्ये हरभऱ्याचे सर्वाधिक क्षेत्र

नांदेड जिल्ह्यात यंदाही रब्बीमध्ये सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे. सध्या हरभरा हे पीक फुलोऱ्यात आहे. या काळात वातावरण चांगले राहिल्याने हरभऱ्यासह गहू, रब्बी ज्वारी, धने, करडई या पिकांचे उत्पादन चांगले येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT