Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : नांदेडला प्रशासन गप्प, विमा कंपनीचे मौन ; नुकसानग्रस्तांना विमा परतावा कधी?

Crop Insurance Company : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर पीक उभे असताना पावसामुळे नुकसान झाले.

Team Agrowon

Nanded News : नांदेड : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर पीक उभे असताना पावसामुळे नुकसान झाले. परंतु अद्याप एकाही घटकातर्गत शेतकऱ्यांना विमा परतावा मंजूर असल्याची माहिती प्रशासनाकडून किंवा विमा कंपनीकडून मिळायला तयार नाही. केवळ कल्क्यूलेशन सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४-२०२५ मध्ये नांदेड जिल्ह्यात पाच लाख ७७ हजार ३५५ शेतकऱ्यांनी ११ लाख २२ हजार २६ अर्ज दाखल करून सात लाख ६३ हजार ५८८ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. यात शेतकऱ्यांचा एक रुपये प्रमाणे ११ लाख २२ हजार, राज्य शासनाचा ३९५ कोटी व केंद्र सरकारचा ३०३ कोटी असा एकूण ६९९ कोटी रुपये विमा हप्ता कंपनीकडे जमा केला आहे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सहा लाख ६३ हजार विमाधारक शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगाम नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळणे अपेक्षित होते. मात्र, विमा कंपनीकडून आजपर्यंत कोणतीही स्पष्ट माहिती किंवा कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे मोठ्या अपेक्षेने विमा हप्ते भरलेल्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

शेतकऱ्यांनी वेळेवर विमा हप्ता भरून योजना राबवली, मात्र कोणत्याही घटकानुसार विमा भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शासन व विमा कंपन्यांनी तातडीने शेतकऱ्यांचे नुकसान पंचनाम्याच्या आधारावर निश्चित करून विमा रक्कम वितरित करावी, अशी मागणी जिल्ह्यातून होत आहे.

अधिसूचना लागू करूनही परतावा नाही
नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा फटका सात लाख शेतकऱ्यांना बसला होता. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी २५ टक्के अग्रिम विमा परतावा मिळावा, यासाठी अधिसूचना लागू केली. परंतु यातही शेतकऱ्यांना परतावा मिळाला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT