Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : नांदेड जिल्ह्याला अवकाळीने झोडपले

Nanded Rain : जिल्ह्यातील कंधार, नायगाव, देगलूर, हिमायतनगर, किनवट आणि भोकर तालुक्यांतील काही गावांमध्ये शनिवारी (ता. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील कंधार, नायगाव, देगलूर, हिमायतनगर, किनवट आणि भोकर तालुक्यांतील काही गावांमध्ये शनिवारी (ता. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

काही भागांत गाराही झाल्या. त्यामुळे गहू, हळद, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, करडईसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या सर्वत्र हळद काढणे, गहू कापणे, राशी करणे ही शेतकऱ्यांची कामे सुरू आहेत.

कापलेल्या गव्हाचे काड शेतावर उघड्यावरच असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली; तसेच आंब्याला लागलेल्या कैरी झडून गेल्या. तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात की काय, अशी परिस्थिती असताना अचानक जोरदार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

वीज पडून एक जण ठार, दोघे गंभीर

जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन घटनांत शनिवारी (ता. १६) वीज पडून एक तरुण ठार तर पती-पत्नी गंभीर जखमी झाले. याशिवाय एक बैल दगावला असून, दुसरा गंभीर जखमी झाला. पहिल्या घटनेत कंधार तालुक्यातील येलूर येथील बालाजी व्यंकटराव शिंदे (वय २०) याचा वीज पडून मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दुसरी घटना नायगाव तालुक्यातील रातोळी येथे सायंकाळी घडली.

वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यात वीज पडून एक शेतकरी दांपत्य गंभीर जखमी झाले. ते शेतातील काम संपवून शेतकरी घराकडे जात होते. अचानक पावसाला सुरुवात झाली. यातच वीज पडून सोपान मस्नाजी गायकवाड (वय ६२) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई गायकवाड या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय शिरशी गावातील झाडाखाली बांधलेला एक बैलही अंगावर वीज पडल्याने दगावला, तर दुसरा बैल गंभीर जखमी झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT