Nanded DCC Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded DCC Bank : नांदेड जिल्हा बँकेचे व्यवहार आता क्यूआर कोडमुळे होणार सोपे

Co-Operative Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत शेतकरी सभासद आणि पगारदार कर्मचाऱ्यांसाठी विविध कर्ज योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

Team Agrowon

Nanded News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत शेतकरी सभासद आणि पगारदार कर्मचाऱ्यांसाठी विविध कर्ज योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

तसेच, ग्राहकांच्या सोयीसाठी बँकेच्या सर्व शाखांमध्ये क्यूआर कोड सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. बँकेने आपल्या आर्थिक स्थिरतेसह जिल्ह्यातील शेतकरी व ग्राहकांसाठी उपयुक्त योजनांचा विस्तार करण्यावर भर दिला असून, ही सर्व कर्ज योजना तातडीने अंमलात आणली जाणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगांवकर यांनी सांगितले.

विशेष कर्ज योजना

बँकेच्या संचालक मंडळाने विविध कार्यकारी/सेवा सहकारी संस्थेच्या सदस्यांना वाढीव खरीप पीक कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ट्रॅक्टर, ट्रॉली आणि शेतीसाठी आवश्यक साधनांसाठी दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जाणार आहे.

सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी तसेच केंद्र शासनाच्या ‘सहकार से समृद्धी’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोदाम बांधणीसाठी विशेष कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पगारदार कर्मचाऱ्यांसाठी गृहकर्ज योजना

बँकेने पगारदार कर्मचाऱ्यांसाठी गृह कर्ज योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत गृहकर्ज देण्यात येणार असून, त्यासाठी कमीत कमी वेळेत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय, ग्राहकांसाठी सवलतीच्या दरात सोने-तारण कर्ज देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT