Vasant Chavan Death Agrowon
ॲग्रो विशेष

Vasant Chavan Death : काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन

Aslam Abdul Shanedivan

Pune News : नांदेडचे खासदार, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते वसंत चव्हाण यांचे सोमवारी (ता. २६) दुःखद निधन झाले. हैद्राबाद येथील किम्स रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. चव्हाण यांच्या निधनामुळे काँग्रेसह नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. तर दिग्गज नेत्यांनी यावरून हळहळ व्यक्त केली आहे.

चव्हाण यांची प्रकृती यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून खालावली होती. सुरुवातीला नांदेडमधील खासगी रुग्णालयात चव्हाण यांना दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यासह कमी रक्तदाबाचा त्रास होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर चव्हाणांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला नेण्यात आले होते. १३ ऑगस्टपासून त्यांच्यावर किम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.

सरपंच ते खासदार

काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेल्या वसंत चव्हाण यांनी सरपंच ते खासदार असा राजकीय प्रवास केला होता. चव्हान १९७८ मध्ये नायगावचे पहिल्यांदा सरपंच झाले होते. तर नांदेड जिल्ह्यात २००९ साली नव्याने तयार झालेल्या नायगाव मतदारसंघाचे ते पहिले आमदार ठरले होते. यादरम्यान त्यांनी जिल्हापरिषदेत आणि विधानपरिषदेत आपल्या कामाची छाप ठाकली होती. २०१४ साली वसंत चव्हाण यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि नायगाव मतदारसंघातून अपक्ष विधानसभेची निवडणूक लढवली. ते विधानसभेत आमदार म्हणून गेले. तर २०२४ च्या लोकसभा निवडणूक त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव केला होता. ते १६ वर्षे विधानपरिषद आणि विधानसभेचे सदस्य होते.

सहकार क्षेत्रात त्यांचे काम लक्ष वेधणारे होते: शरद पवार

वसंत चव्हाण यांच्या निधणावरून जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी देखील दुख व्यक्त केलं आहे. नांदेडच्या जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विनम्र आणि अनुभवी नेतृत्व आज हरपले. काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. राजकारण आणि सहकार क्षेत्रात त्यांचे काम लक्ष वेधणारे आहे. जनकल्याणासाठी त्यांनी केलेला राजकीय प्रवास हा लक्षणीय आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहावेदना व्यक्त करून वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला : नाना पटोले

यावरून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, ज्येष्ठ नेते, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे. प्रतिकूल परस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला. वसंतरावजी चव्हाण यांना जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो. चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत असल्याचे म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Cotton Subsidy : दीड लाखावर शेतकरी कापूस, सोयाबीन अर्थसाह्यापासून वंचित राहण्याची शक्यता

E-Peek Pahani : खरिपातील ७ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीकपाहणी

Agrowon Podcast : कांदा भावात नरमाई; कापूस, सोयाबीन, डाळिंब तसेच काय आहेत आले दर ?

Strawberry Nurseries Rain Damage : पावसाने स्ट्रॉबेरी रोपवाटिकांचे नुकसान, लागवडी रखडल्याने शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT