Namo Drone Didi Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Namo Drone Didi Scheme: ‘नमो ड्रोन दीदी’ योजना अंमलबजावणीसाठी समिती

Implementation Committee: राज्यात ‘नमो ड्रोन दीदी’ या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: राज्यात ‘नमो ड्रोन दीदी’ या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणी व संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये अप्पर सचिव हे अध्यक्ष तर कृषी आयुक्त सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या योजनेची लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या उद्देशासाठी भाड्याने ड्रोन सेवा देण्याकरिता महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारने ‘नमो ड्रोन दीदी’ ही योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत २०२४-२५ व २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये संपूर्ण भारतात १४ हजार ५०० निवडक महिला स्वयंसाह्यता गटांना ड्रोन पुरविण्यात येणार असून,

या योजनेकरिता केंद्र शासनाकडून १२ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ड्रोनच्या खरेदीसाठी महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन व इतर साहित्य, आनुषंगिक खर्चाच्या ८० टक्के दराने जास्तीत जास्त ८ लाख रुपयांपर्यंतचे केंद्रीय आर्थिक साह्य देण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय समिती हे काम पाहणार

ड्रोन सुविधा प्रभावीपणे पुरवता यावी याकरिता लागवडीखालील क्षेत्र कृषी विभागामार्फत निवडणे.

निवडलेल्या क्षेत्रामध्ये अंतर्गत उमेद अभियानामार्फत नोंदणीकृत समूह स्तरीय संघटना व महिला स्वयंसहायता गटामधून महिलांची निवड करणे.

जिल्हानिहाय ड्रोन वापराचे मूल्यांकन कृषी विभागामार्फत करुन घेणे.

ड्रोन वापरासाठी विद्यमान अंतर, उपलब्धता आणि भविष्यातील आवश्यकता ओळखणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT