Bachchu Kadu : माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील ‘७/१२’ कोरा यात्रेमुळे नागपूर-तुळजापूर महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली आहे. यवतमाळकडून नांदेडकडे आणि विरुद्ध दिशेने जाणारी वाहतूक दोन्ही लेनवर ठप्प झाली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथे समारोपासाठी जात आहे.
पापळ गावापासून सुरू झालेली ही १३८ किमीची सात दिवसांची पायी यात्रा शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात होत आहे. १३८ किमीचे पायी अंतर पार करीत उंबरडा बाजार, मानकी, वळसा, तिवरी, तुपटाकळी, काळी दौलत, गुंज अशी गावे करत यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या ठिकाणी देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या गावात यात्रेचा समारोप होत आहे.
मागील ३ महिन्यात महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवले आहे. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. तसेच राज्यात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्याची नोंद झाली आहे. मात्र आता शेतकऱ्यांसाठी आम्ही जात, पात, धर्म, राजकीय विचार सर्व बाजूला ठेऊन एकत्र आलो असून शेतकऱ्याचा सातबारा कोरा केल्याशिवाय आता थांबायचं नाही असा निर्धार आम्ही केला आहे. असे माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
यात्रेत आमदार रोहित आर आर पाटील सहभागी झाले.यात्रेत बोलताना ते म्हणाले, माझे आजोबा व्यसनाने गेले.परंतु माझ्या आजीने आणि वडलांनी फक्त शेतीच्या आधारे त्या काळात ५० हजारांचे कर्ज फेडले. परंतु शेती आता आतबट्याची झाली आहे. शेतकऱ्यांवर शासनच्या चुकीच्या धोरणांमुळे संकट आले आहे. त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे.
बच्चू कडू समारोपाच्या भाषणात बोलताना म्हणाले, शेतकऱ्यांनो जर तुमच्या घरी वसुलीला कोणी आलं तर मला सांगा आपण त्याला झोडून काढू. हि लढाई कर्जमाफीची आणि पुढची लढाई हमीभावाची आहे हे लक्षात ठेवा.हे आंदोलन आपल्याला तेवत ठेवावे लागेल.शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या तरी आमच्यासाठी हि मोठी गोष्ट झाली असं आम्ही समजतो.
पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे MREGS सोबत जोडून घेण्याची मागणीही त्यांनी या निमित्तीने त्यांनी सरकारकडे केली.शेतकऱ्याचा ६० टक्के खर्च मजुरीवरच होतो.त्यांनी रोहित पाटलांना हा मुद्दा विधानसभेत मांडायला सांगितला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.