Illegal Agri Inputs  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Agri Inputs : अनधिकृत निविष्ठा विक्रीविरोधात कृषी व्यावसायिकांचा बंद

HTBT Seed : एचटीबिटी (हर्बिसाईड टॉलरंट बिटी) बियाण्याच्या आड किटकनाशकासह खताची विक्री केली जात आहे. याचा परिणाम कृषी सेवा केंद्राच्या उत्पन्नावर झाला आहे.

Team Agrowon

Nagpur News : एचटीबिटी (हर्बिसाईड टॉलरंट बिटी) बियाण्याच्या आड किटकनाशकासह खताची विक्री केली जात आहे. याचा परिणाम कृषी सेवा केंद्राच्या उत्पन्नावर झाला आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना देखील अप्रमाणित निविष्ठा मिळत असल्याने त्यांचाही हंगाम वाया जात नैराश्‍य निर्माण होते. या बाबीचा विरोध म्हणून नागपूर जिल्हा ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने सोमवारी (ता.३०) बंद पाळत धरणे देण्यात आले.

कृषी विभागासह पोलिसांच्या असहकार्यामुळे गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात अनधिकृत एचटीबिटी बियाण्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. एचटीबिटी विक्रेत्यांनी त्याकरीता गावागावात एजंटची नियुक्‍ती केली असून त्याआड आता बियाण्यांसोबत अप्रमाणित कीटकनाशक व खतेही विकली जात आहेत.

याचा परिणाम रीतसर परवाना घेऊन निविष्ठा विक्री करणाऱ्यांच्या व्यवसायावर झाला आहे. यंदाच्या हंगामात एकूण उत्पन्नाच्या दहा टक्‍के घट नोंदविण्यात आली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना देखील अप्रमाणित निविष्ठा मिळत असल्याने त्यांची उगवण न झाल्यास नुकसान होत शेतकरी नैराश्‍यात जातात व आत्महत्याही वाढतात.

त्यामुळे शासनाने बेकायदेशीर निविष्ठांवर कारवाईसाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणी ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभिजित काशीकर यांनी यावेळी बोलताना केली. सचिव विजय चांडक यांनी देखील शासनाने कारवाई न केल्यास त्याचा महसुलावर परिणाम होतो.

त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज मांडली. तालुका अध्यक्ष राजू बुध्दे यांनी मत मांडले. खतावर होणाऱ्या लिंकिंगचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यावेळी उपाध्यक्ष नितीन भोयर, कोशाध्यक्ष विजय लोहिया, नितीन पद्मवार, अभिलेख वैद्य, मधुर बंग, शेखर झाडे, आशिष सावजी, दीपक अग्रवाल, हरीश राठी यांची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा आवक टिकून; सोयाबीन दरात सुधारणा, कापूस दरात वाढ, तर टोमॅटो दर टिकून तर कारलीली उठाव

Paus Andaj: राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज; पुढील ३ दिवस थंडीचा कडाका कमीच राहणार

Student Achievement: भारत सरकारच्या वीरगाथा राष्ट्रीय पुरस्कारासाठी मंजुश्री घोरपडेची निवड

Illegal Electricity Connection: थकबाकीमुळे खंडित वीजजोडणी परस्पर जोडणाऱ्यांवर कारवाई: पडळकर

Education Loan Scheme: उच्च शिक्षणासाठी मिळणार ४० लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या काय आहे सरकारची योजना

SCROLL FOR NEXT