Nagar DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar DCC Bank : जिल्हा बॅंकेने पतसंस्थांना कॅश‌ क्रेडिट सुविधा द्यावी

Credit Society : आर्थिक गैरव्यवहार व अनियमित कारभारामुळे पारनेर तालुक्यातील दोन पतसंस्था अडचणीत आल्या आहेत.

Team Agrowon

Nagar News : पारनेर तालुक्यासह जिल्ह्यातील पतसंस्था चळवळ टिकवण्यासाठी, आर्थिक सुस्थितीतील पतसंस्थांना ताळेबंदाच्या आधारावर जिल्हा सहकारी बॅंकेमार्फत कॅश क्रेडिट सुविधा उपलब्ध करून देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, सीताराम गायकर, गीतांजली शेळके, राजेंद्र नागवडे यांनी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.

सहकारमंत्री वळसे पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक गैरव्यवहार व अनियमित कारभारामुळे पारनेर तालुक्यातील दोन पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे पतसंस्था क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फटका भक्कम आर्थिक स्थिती असलेल्या पतसंस्थांना बसला आहे.

त्यामुळे तालुक्यात आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे सुस्थितीतील पतसंस्थांना जिल्हा बँकेमार्फत कॅश क्रेडिट तसेच इतर आर्थिक सुविधा देण्याची परवानगी कायद्याच्या अधीन राहून राज्यात सहकार विभागात धोरणात्मक काही बदल करून द्यावा.

पतसंस्थांबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याने काही लोक राजकीय मंडळींकडून राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून या गोष्टीला खत पाणी घालून सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे तसे प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसत आहेत.

प्रशिक्षण शिबिर घ्या...

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, की सहकारी संस्था अधिक बळकटीकरण होण्याच्या दृष्टीने नगर जिल्ह्यात एक दिवसाचे प्रशिक्षण शिबिर घ्यावे. या शिबिरासाठी मी स्वतः उपस्थित राहील. प्रशांत गायकवाड यांना या वेळी सूचना करत जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांची माहिती वळसे पाटील यांनी त्यांच्याकडून घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT