Music Education In ZP School  Agorwon
ॲग्रो विशेष

ZP Education : जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना संगीताचे धडे

Music Education : १ फेब्रुवारी रोजी झालेल्या वर्गामध्ये सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन गीत गायनाचे धडे दिले. या सत्राचे संचालन गायक तन्मय भावलकर यांनी केले.

Team Agrowon

Washim News : प्रख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पी.एम. श्री. जि. प. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (मंगरूळपीर) येथे ऑनलाइन संगीत व गायन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. हा उपक्रम २५ सप्टेंबर २०२४ पासून दर गुरुवारी राबविला जात आहे.

१ फेब्रुवारी रोजी झालेल्या वर्गामध्ये सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन गीत गायनाचे धडे दिले. या सत्राचे संचालन गायक तन्मय भावलकर यांनी केले. विशेष म्हणजे, तीन राज्यांमधील निवडक शाळांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. आभासी पद्धतीने उपस्थित होत्या. उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, मुख्याध्यापक एस. पी. टिक्कस, पर्यवेक्षक विनोद बाबरे, तसेच कलाशिक्षक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संगीत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेच्या प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी ठरत असून, ग्रामीण भागातील संगीतप्रेमींसाठी राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज कलाकारांकडून थेट शिक्षण मिळवण्याचा अनमोल अनुभव ठरतो आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT