Dam Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Mula Dam Water Storage : मुळा धरण पन्नास टक्के भरण्याच्या मार्गावर

Bhandardara Reservoir : भंडारदरा धरणात ५६ टक्के, तर निळवंडे धरणात ४७.७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. जून महिन्यात पाऊस कमी असला तरी धरणातील पाणीसाठ्याने लाभक्षेत्रातील का हाईना शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडीप असली तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढत आहे. जिल्ह्यातील मोठे असलेल्या मुळा धरणात ४८ टक्के पाणी जमा झाले आहे. भंडारदरा धरणात ५६ टक्के, तर निळवंडे धरणात ४७.७२ टक्के पाणीसाठा झाला आहे. जून महिन्यात पाऊस कमी असला तरी धरणातील पाणीसाठ्याने लाभक्षेत्रातील का हाईना शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यात यंदा मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. दुष्काळी भागातील अडीच टीएमसी क्षमतेचे सीना धरण यंदा पहिल्यांदाच मे महिन्यातील पावसाने भरले. अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड, आंबीत, वाकी ही धरणे भरली. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे.

दुष्काळी पट्ट्यात पेरलेले सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. असे असली तरी मुळा, भंडारदरा, निळवंडे, तसेच अहिल्यानगर जिल्ह्याला लाभ असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोटात जोर कमी असला तरी अधूनमधून पाऊस सुरु आहे. सध्या मुळा, भंडारदरा, निळवंडे व अन्य धरण पाणलोटात नेहमीच्या तुलनेत पन्नास टक्केही पाऊस पडत नाही. त्यामुळे धरणात पाणी जमा होत आहे.

२६ टीएमसी क्षमतेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले मुळा धरण ५० भरण्याच्या मार्गावर आहे. आज (सोमवारी) सकाळी आठ वाजता मुळात ४८ टक्के पाणीसाठा झाला होता. ११ टीएमसी क्षमतेचे भंडारदरा व साडेआठ टीएमसी क्षमतेचे निळवंडे धरण १५ आॅगस्टच्या आधी दरवर्षी भरत असते.

पाऊस सुरु राहिला तर यंदाही येत्या दीड महिन्याच्या आत ही धरणे भरतील अशी आशा आहे. पाऊस नसला तरी धरणा पाणलोटात पाऊस पडत असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणात तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, तालुक्यातील अनेक भागांना नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी मिळते.

त्या भागातही यंदा चांगला पाऊस असून धरणाचा पाणीसाठा मुबलक असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. दुष्काळी भागातील घाटशीळ पारगाव व बेलपारा (ता. पाथर्डी) कोरडे असून मांडओहळ (ता. पारनेर), आदी धरणात अल्प पाणी आहे.

धरणातील पाणीसाठा

मुळा ४८.०० टक्के

भंडारदरा ५५.९० टक्के

निळवंडे ४७.४२ टक्के

आढळा ९०.७५ टक्के

भोजापुर ९२.५२ टक्के

पिंपळगाव जोगा ०.१५ टक्के

येडगाव ६३.६३ टक्के

वडज ५९.६७ टक्के

माणिकडोह १४.३० टक्के

डिंभे ३६.७५ टक्के

घोड ८३.४६ टक्के

मांडओहळ ८०.९१ टक्के

घाटशीळ पारगाव ० टक्के

सीना १०० टक्के

खैरी ३२.३५ टक्के

विसापूर ९२.६२ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT