Fruit Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance: मृग बहार २०२५ ; फळपिक विम्यासाठी अर्जास ६ जुलैपर्यंत मुदतवाढ: कृषीमंत्री कोकाटे

Deadline Extended: मृग बहार २०२५ साठी हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या अर्जास राज्य सरकारने चार दिवसांची मुदतवाढ दिली आहे. शेतकरी आता ६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करू शकतील.

Roshan Talape

Pune News: हवामान आधारित फळपिक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून, शेतकरी आता ३ जुलैपासून ६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करू शकतील. हा निर्णय केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून घेण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे.

या योजनेसाठी अर्ज करताना अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी आल्यामुळे त्यांचे अर्ज पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२५ होती. मात्र २७ जूनपासून आधार संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या. ही अडचण लक्षात घेऊन शासनाने अर्ज करण्याची मुदत चार दिवसांनी वाढवून ६ जुलै २०२५ केली आहे.

कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयामुळे फळपिक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ शक्य झाली आहे. या निर्णयामुळे हजारो फळपिक उत्पादक शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळवण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

ही योजना द्राक्ष, पेरू, लिंबू, संत्रा, चिकू आणि मोसंबी अशा फळपिकांसाठी आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट किंवा हवामानातील बदलामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेतून आर्थिक भरपाई मिळते. त्यामुळे अर्ज करण्याची अंतिम तारीख आता ६ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज केला नाही, त्यांनी ही संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन कृषीमंत्री कोकाटे यांनी केले आहे.

अर्ज कसा करायचा?

शेतकऱ्यांनी www.pmfby.gov.in या केंद्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे.

त्यानंतर आपल्या वैयक्तिक माहितीबरोबरच शेतीविषयक तपशील भरावा.

शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) अनिवार्य आहे. त्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.

सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज ऑनलाईन सादर करावा.

अर्ज केल्यानंतर त्याची प्रिंट काढून स्वतःकडे सुरक्षित ठेवावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT