Supriya Sule Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Supriya Sule Kolhapur : सिंचन घोटाळा प्रकरण! सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी. तसेच ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत त्यांच्या संदर्भातील फाईल विरोधकांना कशी काय दाखवली जाते?

sandeep Shirguppe

Supriya Sule VS Devendra Fadanvis : भाजप ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो ते सगळे भारतीय जनता पार्टीत सामील होतात. ७० हजार कोटींच्या घोटाळा केल्याचा ज्यांच्यावर आरोप त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केल्याचे कसे दाखवले? फडणवीस यांनी राज्यातील जनतेला फसवलं आहे. अशी सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे सोमवार (ता. ०४) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत यांनी भाजपसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरादर टीका केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला फसवले आहे, फडणवीसांनी महाराष्ट्राची माफी मागावी. तसेच ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप आहेत त्यांच्या संदर्भातील फाईल विरोधकांना कशी काय दाखवली जाते? अशी विचारणा सुद्धा सुळे यांनी केली.

दिल्लीच्या अदृश्य शक्तीला आपण कशाला घाबरायचं, लढायचे की घाबरायचं हे जनतेनेच ठरवावे. भाजपकडून नवाब मलिक यांच्यावर रोज टीका केली जायची. देवेंद्र फडणीस यांनी तर त्यांच्या विरोधात पत्रके काढून टीका केली होती. आम्ही फडणवीस यांच्याकडे लढावू नेते म्हणून बघायचो पण असं काहीच दिसत नाही. अशी टीका सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली.

सुळे पुढे म्हणाल्या की, निवडणुकीत सगळ्यांनाच मत मागण्याचा अधिकार आहे. तसेच दादा त्यांच्यासाठी मते मागत असतील. मात्र, बारामतीची जनता ठरवेल कोणाला मत द्यायचं आहे, असे सुळे म्हणाल्या. राज्याचा मुख्यमंत्री महिला होऊ दे किंवा पुरुष होऊ दे पण राज्याला पुढे घेऊन जाणारा मुख्यमंत्री असला पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हसन मुश्रीफांवर टीका

हसन मुश्रीफ यांच्या पत्नी खूप धाडसी आहेत. त्यांना खरोखर मानलं पाहिजे. दिल्लीतील अदृश्य शक्तीला आपण कशाला घाबरायचं, लढायचे की घाबरायचं हे बघा असा टोला सुद्धा हसन मुश्रीफ यांना लगावला. गेल्या काही दिवसांपासून मुश्रीफ यांनी मी शरद पवारांना करून गुरुदक्षिणा दिल्याचं सातत्याने सांगत आहेत. त्यांनी काय गुरूदक्षीणा दिला हे मुश्रीफांनी जाहीर सांगावं असेही सुळे म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT