Milk Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Price Protest : दूधदरावरून आंदोलन पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली

Farmer Issue : दुधाला मिळणारा दर परवडत नाहीत. पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत. असे असताना दुधाला दर वाढवून मिळण्याऐवजी दुधाचे दर कमी करून हा व्यवसाय पुन्हा अडचणीत आणला जात आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : दुधाला मिळणारा दर परवडत नाहीत. पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत. असे असताना दुधाला दर वाढवून मिळण्याऐवजी दुधाचे दर कमी करून हा व्यवसाय पुन्हा अडचणीत आणला जात आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा दूधदरासाठी आंदोलन उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शनिवारी (ता. २९) श्रीरामपूर येथे शेतकरी संघटनेकडून बैठकीचे आयोजन केले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करत आहेत. मात्र या व्यवसायाला चांगले दिवस यावेत यासाठी सरकारी पातळीवर फारसे प्रयत्न केले जात नाहीत. पशुखाद्य, चाऱ्याचे दर वरचेवर वाढत असताना दुधाला मात्र उत्पादनावर आधारित दर दिला जात नसल्याने हा व्यवसाय सातत्याने अडचणीत येत आहे.

दुधाला ४० रुपये हमीभाव, दूध भेसळ विरोधी कडक कायदे, पशुखाद्याचे वाढलेले दर, त्याचप्रमाणे उसाच्या धर्तीवर दुधाला एमएसपीसारखा कायदा व्हावा अशा मागण्या सातत्याने केल्या जात आहेत.

मागील काळात झालेल्या आंदोलनानंतर सरकारने ३० रुपये दर व पाच रुपये अनुदान देत सकारात्मकता दाखवली होती. परंतु, आजपर्यंत पाच महिने उलटत येऊनही बहुतांश शेतकऱ्यांना अनुदान जमा झाले नाही.

पशुखाद्याचे दरही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले. अलीकडचे काही दिवसापूर्वी दुधाचे दर पुन्हा कमी केल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. श्रीरामपूर येथे दुध उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बैठक बोलावली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

MIDC Long March : एमआयडीसीविरोधात वर्णे ते सातारा ‘लाँग मार्च’

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

SCROLL FOR NEXT