Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

ShaktiPeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली; पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव

ShaktiPeeth Highway Maharashtra : शक्तिपीठ महामार्गामुळे ते अंतर ८०२ किमीचे होणार आहे. पत्रादेवी येथे या महामार्गाची सुरुवात होऊन तो वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे संपणार आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला असल्याचे महायुती सरकारने घोषीत केले होते. मात्र, महायुती सरकारने पुन्हा शक्तिपीठ महामार्ग होण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत एमएसआरडीसीकडून पर्यावरण विभागाच्या मंजुरीसाठी (शुक्रवार) १० जानेवारी २०२५ ला प्रस्ताव पाठविला आहे.

कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांचा विरोध

विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महामार्गाविरोधात जोरदार मोर्चे काढले होते. या विरोधाची दखल घेत महायुतीच्या नेत्यांनी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सप्टेंबरमध्ये या महामार्गाची भूसंपादनाची अधिसूचना राज्य सरकारने रद्द केली होती.

आता निवडणुका संपताच पुन्हा या प्रकल्पासाठी एमएसआरडीसीने हालचाली सुरू केल्या आहेत. एमएसआरडीसीने पर्यावरण मंजुरीसाठी १० जानेवारी २०२५ ला प्रस्ताव पाठविला आहे. नव्या प्रस्तावात यापूर्वीचाच मार्ग निवडला आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकल्पाला विरोध होण्याची शक्यता आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रकल्प रद्द करण्यासाठी पर्यावरण दाखल्यासाठी केलेला अर्ज मागे घेतला होता. आता देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर याप्रकल्पासाठी पुन्हा अर्ज करण्यात आला आहे. हा महामार्ग गोवा (पत्रादेवी) ते विदर्भातील वर्धा जिल्ह्यापर्यंत जोडला जाणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

सहापदरी शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाची लांबी नागपूर-मुंबई महामार्गापेक्षा जास्त असेल. हा महामार्ग ८०२ किलोमीटर लांब आहे, जो ७०१ किलोमीटर लांबीच्या सध्या अंशतः सुरू असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गापेक्षा अधिक आहे. सध्या गोव्यातून रस्तामार्गे नागपूरला जाण्यासाठी १८ ते २१ तास लागतात. हे अंतर १ हजार ११० किलोमीटर आहे. मात्र, शक्तीपीठ महामार्गामुळे ते अंतर ८०२ किमीचे होणार आहे. पत्रादेवी येथे या महामार्गाची सुरुवात होऊन तो वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे संपणार आहे.

८६ हजार ३०० कोटींचा प्रकल्प

शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी ८६ हजार ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एमएसआरडीसीने गेल्यावर्षी या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली होती. राज्य सरकारने त्याची अधिसूचना काढून १२ जिल्ह्यांमध्ये २७ भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT