Animal Husbandry Department Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Disease Lab : पशुसंवर्धन प्रयोगशाळेबाबत केंद्र-राज्यामध्ये सामंजस्य करार

Department Of Animal Husbandry : नुकतेच औंधमधील जैवसुरक्षा स्तर-२ व ३च्या नव्या इमारतीचे उद्‍घाटन झाले असून, त्यानंतरच्या सेवांसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि खर्च भागविण्यासाठी केंद्र सरकारकडून होणारे अर्थसाह्य उपयुक्त ठरणार आहे.

Team Agrowon

Pune News : औंध येथे नुकत्याच उद्‌घाटन झालेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राज्यस्तरीय पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळेच्या बळकटीकरणासाठी केंद्राच्या पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग आणि राज्य शासनाच्या पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. दिल्लीमध्ये बुधवारी (ता. ४) झालेल्या कार्यक्रमात करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

कार्यक्रमाला केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या सचिव अलका उपाध्याय, अतिरिक्त सचिव रामा शंकर सिन्हा, आयुक्त डॉ. अभिजित मिश्रा, राज्य शासनाकडून पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. उपस्थित होते.

नुकतेच औंधमधील जैवसुरक्षा स्तर-२ व ३च्या नव्या इमारतीचे उद्‍घाटन झाले असून, त्यानंतरच्या सेवांसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि खर्च भागविण्यासाठी केंद्र सरकारकडून होणारे अर्थसाह्य उपयुक्त ठरणार आहे.

या करारामुळे औंध येथील प्रयोगशाळेचे आधुनिकीकरण, उपकरणांची देखभाल, आवश्यक साधनसामग्री खरेदी आणि कंत्राटी मनुष्यबळ भरती या सर्व बाबींना केंद्र शासनाची आर्थिक मदत मिळणार आहे.

परिणामी, प्रयोगशाळेच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार असून, पशुरोग निदानासाठी ही सुविधा अधिक सक्षम होणार असल्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी सांगितले.

सामंजस्य करारामुळे रोगनिदान पायाभूत सुविधा मजबूत होतील. या सहकार्याचे उद्दिष्ट देशभरात प्रयोगशाळेची सुसज्जता वाढवणे आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक सेवांचा दर्जा सुधारणे आहे. तत्काळ प्रतिसाद देणारी पशुवैद्यकीय निदान साखळी तयार करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
- डॉ. रामास्वामी एन., सचिव, पशुसंवर्धन विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance: केळी, आंब्याला हवामान आधारित विमा परतावा मंजूर

Agriculture Irrigation: ‘विष्णुपुरी’तून दोन पाणीपाळ्या मिळणार

Environment Protection: झाडे वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले !

Satara District Bank: सातारा जिल्हा बॅंकेचे कामकाज उल्लेखनीय : बाबासाहेब पाटील

Dairy Development Project: विदर्भ, मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोनची अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT