Agriculture Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Pump Electricity Supply : सोलारपूर जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार कृषिपंपांना वीजजोडणी

Agriculture Pump : पुणे विभागात पुणे जिल्ह्यात १३ हजार ३५५ कृषिपंपांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून, सांगली जिल्ह्यात ११ हजार ९४० जोडण्या, सातारा जिल्ह्यात १० हजार ४०८ जोडण्या देण्यात आल्या.

Team Agrowon

Solapur Electricity News : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागांतर्गत येणाऱ्या सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण ६१ हजार ३७८ शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून, या एकूण जोडण्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ७४० जोडण्या देण्यात आल्या आहेत.

पुणे विभागात पुणे जिल्ह्यात १३ हजार ३५५ कृषिपंपांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून, सांगली जिल्ह्यात ११ हजार ९४० जोडण्या, सातारा जिल्ह्यात १० हजार ४०८ जोडण्या देण्यात आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात ६९३५ जोडण्या देण्यात आल्या आहेत.

तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार ७४० जोडण्या देण्यात आल्या. महावितरणने मागेल त्या शेतकऱ्याला वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठरविले असून, शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणीचा रीतसर अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

आकडे टाकून अनधिकृत वीज वापर करू नये, जर केल्यास विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महावितरणकडून देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT