Monsoon 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon 2024 : पश्चिम विदर्भात अखेर मॉन्सूनचे आगमन

Maharashtra Rain : पश्चिम विदर्भात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मंगळवारपासून (ता.११) पावसाचे वातावरण बनले आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस झाला.

Team Agrowon

Akola News : पश्चिम विदर्भात मॉन्सूनचे आगमन झाले आहे. मंगळवारपासून (ता.११) पावसाचे वातावरण बनले आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊस झाला. वादळी पावसाने नागरिकांची पळापळ केली. अकोला जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात वीज कोसळल्याने एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत एक युवक शेतात मृत आढळून आला. त्याचाही मृत्यू वीज कोसळून झाला असावा, अशी शंका आहे. या तालुक्यातील टीपराळा येथील शाळिग्राम श्रीराम डोंगरे (वय ६५ वर्षे ) हे त्यांच्या शेतात झाडाखाली थांबले असताना सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ब्रम्ही खुर्द येथील तलाठ्याने अहवाल दिला आहे. तर मौजे खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे (वय अंदाजे २६ वर्षे) हे सोपान टापरे यांच्या शेतात मृतावस्थेत आढळून आले. त्यांचाही विजेमुळे मृत्यू झाला अशी चर्चा आहे.

काही ठिकाणी जोरदार पाऊस

अकोला जिल्ह्यात मंगळवारी (ता.११) दुपारी तसेच रात्री अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. यात प्रामुख्याने पणज मंडलात २२.८, आसेगाव बाजार २७, उमरा २१, अकोलखेड ८८.३, पातूर ६३.८, चान्नी १४.३, सस्ती ३४.८ , अकोला ३९.७, घुसर ३३, सांगळुद ३३, बार्शीटाकळी २१.३, महान २५.३, धाबा २७.३, मूर्तीजापूर ७८.८, निंबा २९.५, माना ३६.३, जामठी ४१.८, बुलडाणा जिल्हयात मंगळवारी जळगाव जामोद तालुक्यात जोरदार पाऊस झाला.

वादळ व पावसाने काही ठिकाणी धुळधाण उडवली. जळगावमध्ये ८६.३, पिंपळगाव काळे ४५.८, आसलगाव ५१.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वाशीम जिल्ह्यात मानोरा १६.३, इंझोरी ६६.८, कुपटा ३५, हिवरा लाहे ५७, उंबरडा बाजार ५४.५, कामरगाव ३८.३, खेर्डा बुद्रूक ३८.३, पोहा ५०, येवता ४९ असा पाऊस झाला.

विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात १६ जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असेल, असा अंदाज आहे. नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. झाडाखाली थांबू नये. वीज चमकत असताना मोबाईल, विजेची उपकरणे बंद ठेवावीत, वाहने विजेचा खांब व झाडापासून दूर ठेवावीत, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT