Moneylending  Agrowon
ॲग्रो विशेष

Moneylending Act : सावकारी कायदा धाराशिवमधील शेतकऱ्यांना वरदान

Rural Finance : जिल्ह्यातील सावकारी पाशात अडकलेल्या अनेक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अर्थात सावकारी कायदा वरदान ठरला आहे.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यातील सावकारी पाशात अडकलेल्या अनेक शेतकऱ्यांना महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अर्थात सावकारी कायदा वरदान ठरला आहे. कायदा लागू झाल्यापासून जिल्ह्यात सहकार विभागाने त्याची प्रभावी जनजागृती व अंमलबजावणी करत अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला.

यातून दहा वर्षात जिल्ह्यात सावकारांवर ५५ गुन्हे दाखल झाले असून या बेकायदा सावकारी व्यवसायातून या सावकारांनी बळकावलेली १०२ हेक्टर स्थावर मालमत्ता शेतकऱ्यांना मिळाली आहे. जिल्हा उपनिबंधक तथा सावकारांच्या निबंधकांनी विविध प्रकरणात निर्णय देत शेतकऱ्यांना ही जमीन परत करण्याचे आदेश दिले आहेत.

कायद्यात बेकायदा सावकारी व्यवसाय करणाऱ्याला अर्थात सावकाराला प्रतिबंध करण्यासाठी अनेक तरतुदी आहेत. अनेक सावकार शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदीखत करुन स्वतःच्या किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावावर करून घेतात. त्याआधारे शेतकऱ्यांना मोठ्या व्याजदराने कर्ज देतात. कर्जाची व्याजासह परतफेड केल्यानंतर जमिनी खरेदीखत करून पुन्हा संबंधित शेतकऱ्यांच्या नावावर करून दिली जाते.

अशा व्यवहारावरुनच जिल्ह्यात अनेक सावकारांचा पर्दाफाश सहकार विभागाने केला शेतकऱ्यांनीही बेकायदा सावकारी व्यवहाराचे असे अनेक व्यवहार सहकार विभागाच्या निदर्शनास आणून दिले. सहकार विभागाने सावकाराच्या घरावर टाकलेल्या छाप्यातही त्यांना बेकायदा सावकारी व्यवसायाशी निगडित अनेक कागदपत्र आढळून आले.

यावरूनच सहकार विभागाने आतापर्यंत ५५ सावकारांविरुद्ध सावकारी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. त्यानंतर अशा सावकारांनी बळकावलेल्या जमिनीच्या अनुषंगाने सुनावणी घेऊन जिल्हा उपनिबंधकांनी १०२ हेक्टर बळकावलेली जमीन शेतकऱ्यांना परत केली आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार महसूल विभागाने फेरफार घेत सावकाराच्या नावावरील जमीन शेतकऱ्याच्या नावावर केली.

प्रभावी जागृती अन् तक्रारींचा पाऊस

जिल्ह्यात दहा वर्षात एक हजार १९७ बेकायदा सावकारी व्यवसायाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. यात धाराशिव तालुक्यातून ३१२, तुळजापूर - २४४, कळंब - १४९, उमरगा - १४९, भूम- १२३, परंडा - ८७, वाशी -३९ व लोहारा तालुक्यातील ८८ तक्रारींचा समावेश आहे. यापैकी एक हजार ३७ तक्रारींची सहकार विभागाने चौकशी पूर्ण करत तथ्य आढळून आलेल्या ५७ सावकारांविरुद्ध कारवाई केली.

यात धाराशिव तालुक्यातील सात, तुळजापूर - १९, कळंब - तीन, उमरगा - चार, भूम - सात, परंडा - १४, वाशी - एक तर लोहारा तालुक्यातील दोन सावकारांचा समावेश आहे. सावकारांनी जमिनी बळकालव्याप्रकरणी २७५ अर्जापैकी १३१ प्रकरणे निकाली काढली. १४४ प्रकरणे प्रलंबित असून यात गेल्या सहा महिन्यांतील ४२, वर्षातील ३८ तर वर्षावरील ६४ प्रकरणांचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांमध्ये सुनावणी असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून देण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT