Election Agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election : लोकसभेपूर्वी मोहरी ग्रामपंचायतीने दिला बहिष्काराचा इशारा

Mohri Gram Panchayat : काही दिवसातच राज्यासह देशात लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. याआधी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका गावाने थेट लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : लोकसभा निवडणूका काहीच महिन्यात लागणार आहेत. यामुळे सध्या राज्यात सत्ताधारी विविध विकास कामांच्या उद्घाटनाच्या माध्यमातून प्रचाराचे नारळ फोडत आहेत. तर विरोधक आक्रमक पवित्रा घेत आहेत. यादरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका गावाने थेट लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा दिला आहे. यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे या गावाकडे सध्या लक्ष गेले आहे. तालुक्यातील मोहरी गावातील ग्रामस्थांनी सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत आचारसंहितेपूर्वी सर्व योजनांचा थेट लाभ द्या, अशी मागणी करत बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

नेमकं काय झालं होतं?

गावातील विहरी आणि इतर प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. यात काही त्रुटी सांगण्यात आल्या होत्या. त्या त्रुटींची तत्काळ पूर्तता करून पुन्हा प्रस्ताव देण्यात आले होते. मात्र त्यावर कोणताच निर्णय न झाल्याने ग्रामस्थांनी आवाज उठवण्यात आला. यानंतर मागील महिन्यात (ता.२७ फेब्रुवारी) सरकारी अधिकाऱ्यांकडून पात्र प्रस्ताव पुढील पाच दिवसांत मंजूर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ते ही पुर्ण झाले नाही. यामुळे ग्रामसभेत विविध योजना आणि प्रस्तावांना मंजूरी मिळावी यासाठी बहिष्कार टाकण्याचा ठरावच ग्रामसभेत घेण्यात आला. याला काही ग्रामस्थांनी पाठिंबा दिला तर काहींनी विरोध केला आहे.

विरोध करणाऱ्या ग्रामस्थांने आवाहन

विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी राज्य सरकारकडून गावात मोठी विकास कामे झाली असून काही प्रगती पथावर आहेत. काहींना प्रस्तावातून व्यक्तीगत लाभ देखील मिळणार आहे. त्यामुळे हा ठराव मागे घेण्यात यावा असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु मोहरी ग्रामपंचायत ग्रामस्थ हे बहिष्कार ठरावावर ठाम असून सरकारला इशारा दिला आहे.

सरपंच आशाबाई वाल्हेकर

यावेळी सरपंच आशाबाई वाल्हेकर यांनी सरकारी योजनांमध्ये व्यक्तिगत लाभाच्या प्रस्तावांना मंजुरी घेणे याला प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. पण अशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क न बजावता बहिष्कार टाकणे बरोबर नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर याबाबत शासनाने ग्रामस्थांचे प्रस्ताव आणि योजनांवर योग्य भूमिका घेत त्या मंजूर कराव्यात. अन्यथा सर्वानुमते लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जाईल. याला ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाही असेही सरपंच वाल्हेकर यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT