Mango Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Orchard : अति घन लागवड आंबा बागेत आधुनिक पद्धतीने छाटणी फायद्याची

Mango Cutting : अति घन लागवड आंबा बागेत आधुनिक पद्धतीने छाटणी केल्यास चांगली फळधारणा होऊ शकते, असे मत आंबा फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : अति घन लागवड आंबा बागेत आधुनिक पद्धतीने छाटणी केल्यास चांगली फळधारणा होऊ शकते, असे मत आंबा फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी व्यक्त केले.

मूकपाठ (ता. सिल्लोड) येथील अशोकराव सूर्यवंशी यांच्या अति घन लागवड केसर बागेत डॉ. कापसे अति घन लागवड बागेतील फळधारणेसाठीच्या छाटणीचे तत्त्व समजावून सांगत होते.

या वेळी त्यांनी चौथ्या वर्षानंतरच्या बागेमध्ये झाडाचा घेर हा फार वर न नेता त्याच्या जमिनीकडील फांद्या फक्त येणाऱ्या हंगामात फळधारणा झाल्यानंतर फळे खाली टेकणार नाही इतक्या उंच राहील.

अशा प्रकारे छाटाव्यात झाडास चांगल्या प्रकारे फळधारणा व्हावी यासाठी झाडांमध्ये पानांची दाटी होऊ नये यासाठी अधूनमधून काही फांद्या कट करून सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्या तयार कराव्यात. हे सर्व प्रात्यक्षिकासह बऱ्याच झाडांची छाटणी करून दाखविले. या वेळी परिसरातील आंबा बागायतदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.

श्री. सूर्यवंशी यांची ही बाग चौथ्या वर्षी एकरी चार टन उत्पादन देऊन गेली. पुढील वर्षी म्हणजे पाचव्या वर्षी हे उत्पादन पाच टनांपर्यंत सहज जाऊ शकते, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला. काही शेतकऱ्यांनीही नवीन अतिघन बाग लागवडीचा मनोदय व्यक्त केला. त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमास संग्राम सूर्यवंशी, पृथ्वीराज दिग्विजय सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, विकास कापसे, जानकीराम टेलर, दामूअण्णा भोबे, अनिल भोम्बे, प्रदीप आडगावकर, आकाश शेळके आदी मंडळी उपस्थित होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT