Sugar Factory Election Agrowon
ॲग्रो विशेष

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’च्या अध्यक्षपदी आमदार नारायण पाटील निश्चित

Cooperative Sugar Mill Election : निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील संजीवनी पॅनेलचे २१ उमेदवार विजयी झाले आहेत. तर माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे.

Team Agrowon

Solapur News : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी आमदार नारायण पाटील यांचे नाव निश्चित झाले असून उपाध्यक्ष पदासाठी दत्तात्रय देशमुख, महेंद्र पाटील, नवनाथ झोळ, डॉ. हरिदास केवार, दादासाहेब पाटील यांची नावे चर्चेत आहेत.

निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील संजीवनी पॅनेलचे २१ उमेदवार विजयी झाले आहेत. तर माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. आता कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी (ता. २८) कारखाना स्थळावर होणार आहे. सकाळी ११ वाजता ही निवड करण्यात येणार आहे.

आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेल्याने अध्यक्षपदासाठी एकमताने आमदार पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी कोणाला संधी मिळणार? हे पाहावे लागणार आहे. कारखाना गेली अनेक वर्षापासून बंद असून हा आर्थिक अडचणीत आहे.

या निवडणुकीत आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, प्रा. रामदास झोळ यांनी पॅनेल उभे केले. या तिरंगी लढतीत खरी लढत आमदार नारायण पाटील व माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलमध्ये झाली. या निवडणुकीपासून माजी आमदार जयवंतराव जगताप व बागल गट अलिप्त राहिले.

माजी आमदार जयवंतराव जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी सुरवातीपासून उघडपणे आमदार पाटील यांना पाठिंबा दिला. तर बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या दोन दिवसात आमदार नारायण पाटील यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला होता.

अकलूज येथील बैठकीत नावाबाबत निर्णय

अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर रविवारी (ता. २७) माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार पाटील यांचे अध्यक्षपदासाठी एकमुखाने नाव घेण्यात आले. पाच वर्षे आमदार नारायण पाटील हे कारखान्याचे अध्यक्ष राहणार आहेत. तर उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी आपले म्हणणे मोहिते-पाटील यांच्यासमोर मांडले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT