Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : ‘पीकविम्याचा लाभ मिळवून देण्यात आमदार अपयशी’

MLA Failed to get Benefit of Crop Insurance : आमदार किशोर पाटील यांच्या नाकर्तेपणामुळे पाचोरा तालुक्यातील विमाधारक लाभांपासून वंचित राहिले असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Team Agrowon

Jalgaon News : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या योजनेत शेतकऱ्यांनी एक रुपया भरून खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला. त्या अनुषंगाने भडगाव तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांची आठ कोटी भरपाई रक्कम जमा होण्यास सुरवात झाली असून,

आमदार किशोर पाटील यांच्या नाकर्तेपणामुळे पाचोरा तालुक्यातील विमाधारक लाभांपासून वंचित राहिले असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

अटल भाजप कार्यालयात अमोल शिंदे यांनी शनिवारी (ता. २३) सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. या वेळी सोमनाथ पाटील, बन्सीलाल पाटील उपस्थित होते. श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले, की पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून पाठपुरावा केल्याने पाचोरा व भडगाव तालुक्यांतील पीकविमाधारक शेतकऱ्यांना अग्रीम रक्कमची मागणी लावून धरली.

मंत्री महाजन यांच्या मुंबई निवासस्थानी १८ ऑक्टोबर २०२३ ला कृषिमंत्र्यांबरोबर बैठक झाली. त्यात पीकविमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आली. त्या अनुषंगाने भडगाव तालुक्यातील तीन महसूल मंडलांतील १८ हजार १७४ शेतकऱ्यांना आठ कोटी आठ लाख ८८ हजार ३४३ रुपये मंजूर होऊन ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली आहे.

मात्र, पाचोरा तालुक्यातील जवळपास ४४ हजार पीकविमाधारक शेतकरी यापासून वंचित असून, आमदारांनी कोणताही आवाज उठवला नाही अथवा पाठपुरावा केला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे.

मंत्री महाजन यांच्या माध्यमातून पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनाही लाभ मिळण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून आमदार किशोर पाटील हे हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवू शकले असते; परंतु शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यात स्वतःचा कुठलाच फायदा त्यांना दिसला नाही. त्यामुळे त्यांनी ती तसदी घेतली नाही. जेथे फायदा दिसतो, त्याच विषयावर ते आवाज उठवितात, असा आरोप त्यांनी आमदार पाटील यांच्यावर केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT