MLA Amel Mitkari On VC Dr. Gadakh Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University : कार्यकारी सदस्य अवमानना प्रकरणी कुलगुरू डॉ. गडाख यांच्याविरुद्ध हक्कभंग आणू; मिटकरी यांचा इशारा

Aslam Abdul Shanedivan

Pune News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ५६ व्या स्थापना दिनानिमित्त रविवारी (ता.२०) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यावेळी विद्यापीठाने आचारसंहितेचे कारण देत विद्यापीठाच्या कार्यकारी सदस्यांचा अवमान केला असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच याप्रकरणी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याविरुद्ध हिवाळी अधिवेशनात हक्कभंग आणू असेही मिटकरी यांनी म्हटले आहे. मिटकरी यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. यानंतर विद्यापीठ प्रशासनाने द्खील आपली बाजू मांडत आपण योग्य सोय केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ५६ व्या स्थापना दिनाच्या ओचित्यावर रविवारी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात विद्यापीठाच्या विद्यमान कार्यकारी सदस्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी विधान परिषदेचे सदस्य तथा कार्यकारी सदस्य आमदार अमोल मिटकरी, नवनिर्वाचित कार्यकारी सदस्य ॲड. किरण सरनाईक तथा मोरेश्वर वानखडे उपस्थित होते. यावेळी आचारसंहिता लागू असल्याने कार्यकारी सदस्यांनी कार्यक्रम मंचावर येऊ नये, असे कुलगुरू डॉ. गडाख यांनी सांगितले. त्यांनी विद्यापीठाच्या कार्यकारी सदस्यांचा अवमान केला. यावरून विद्यमान कार्यकारी सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

तसेच ध्वजारोहणापूर्वीच ध्वज खाली पडला होता. ते विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले आहे. याबाबतचा व्हिडिओ, सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर तेही राज्यपाल, विधान परिषदेचे उपसभापती यांना सादर करू असेही आमदार मिटकरी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या दोन्ही बाबींवरून कार्यकारी सदस्यांनी कुलगूरूंच्याविरोधत हिवाळी अधिवेशनात हक्कभंग आणण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्यपाल तथा विधान परिषदेच्या उपसभापती यांच्याकडे हक्कभंगचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रसिद्धीपत्रकानंतर कृषी विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत कृषी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी, विद्यापीठाने कार्यकारी सदस्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रीत केले होते. तर स्वतः कुलसचिव सुधीर राठोड या सदस्यांना आणण्यासाठी गेले होते. त्यांच्या बसण्याची योग्य व्यवस्था विद्यापीठाने केली होती. पण आचारसंहितेबाबतच्या सुचना जिल्हाधिकारी महोदयांनी दिल्याने त्याचे पालन विद्यापीठ प्रशासनाने केले, असे स्पष्टीकरण बिडवे यांनी दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paus Andaj : राज्यात ३ दिवस पावसाचे वातावरण; अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता!

Rabi Season 2024 : यंदा साडेतीन लाख हेक्टरवर रब्बीचे बुलडाण्यात नियोजन

Land Dispute : गावकऱ्यांचा डाव

Cattle Census App : तांत्रिक अडचणीत अडकलेल्या पशुगणनेची अखेर तारीख ठरली

Labor Shortage : पावसामुळे शेतकऱ्यांची घालमेल वाढली

SCROLL FOR NEXT