Manikrao Kokate  Agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate : ‘कृषी खाते ही ओसाड गावची पाटीलकी’

Agriculture Minister's Statement : ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला जाणीवपूर्वक कृषी खाते दिले आहे. आपल्याला कल्पना आहे, तशी ही ओसाड गावची पाटीलकी आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला जाणीवपूर्वक कृषी खाते दिले आहे. आपल्याला कल्पना आहे, तशी ही ओसाड गावची पाटीलकी आहे. मात्र तरीही यातही अधिक चांगले काम करता येऊ शकते, हे उदाहरण आपल्याला घालून द्यायचे आहे,’’’’ असे वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी (ता. ३०) एका कार्यक्रमात केले. या त्यांच्या वक्तव्यावरून पुन्हा माध्यमातून त्यांच्यावर टीका होत आहे.

कृषिमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून श्री. कोकाटे अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल त्यांची कानउघाडणीही केली होती. परंतु तरीही श्री. कोकाटे यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत.

काही दिवसांपूर्वीच अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करताना ‘ढेकळाचे पंचनामे करायचे का’’ असे वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. त्यावर त्यांनी सारवासारव करून आपल्या वक्तव्याचा गैरअर्थ काढल्याचा खुलासा केला होता.

जॉईंट ॲग्रेस्को निमित्ताने परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कार्यक्रम आटोपून श्री. कोकाटे शुक्रवारी (ता. ३०) छत्रपती संभाजीनगर येथे प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादासाठी आले होते. या परिसंवादाला जाण्यापूर्वी त्यांनी एमजीएम परिसरातील आर्यभट्ट सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

त्या वेळी कृषिमंत्री कोकाटे यांनी शासन शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कसे काम करते आहे याची मांडणी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी शेतीमध्ये एआय तंत्रज्ञान रुजविण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली. आणखी हजार-पाचशे कोटी देण्याची त्यांची तयारी आहे. त्यांचे कृषी खात्याकडे विशेष लक्ष आहे.

शेतकऱ्यांना भक्कम करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता भासली तर ती देण्यास ते तयार आहेत. हे सांगताना श्री. कोकाटे म्हणाले की, आपल्याला कल्पना आहे, कृषी ही ओसाड गावची पाटीलकी, पण तरी त्यामध्ये अधिक चांगले काम करता येऊ शकते, हे आपल्याला पुढे न्यायचे आहे. संरक्षित शेती, शाश्वत शेती हे पुढचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT