Minister Jaykumar Gore  Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Jaykumar Gore : कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली; मंत्री जयकुमार गोरेंनी आरोप फेटाळले

Maharashtra Politics: गोरे म्हणाले, २०१९ कोर्टाने माझी निर्दोष मुक्तात केली आहे. निकालाची प्रत माझ्याकडे आहे. परंतु विरोधक माझी बदनामी करत आहे. त्यामुळे मी माझ्या बदनामीचा खटला दाखल करणार आहे.

Dhananjay Sanap

Political Allegations: राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतरायज मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांचे आरोप धुडकावून लावले आहेत. कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे, मात्र विरोधक माझी बदनामी करत आहेत, असं गोरे यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. महिलेला नग्न फोटो पाठवून छळ केल्याचा आरोप संजय राऊत आणि कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गोरे यांच्यावर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

गोरे म्हणाले, "२०१९ कोर्टाने माझी निर्दोष मुक्तात केली आहे. निकालाची प्रत माझ्याकडे आहे. परंतु विरोधक माझी बदनामी करत आहे. त्यामुळे मी माझ्या बदनामीचा खटला दाखल करणार आहे. तसेच विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. जी कारवाई अपेक्षित ती करणार आहे," असा इशारा राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतरायज मंत्री यांनी दिला आहे.

पुढे गोरे म्हणाले, "२०१७ साली माझ्याविरोधात एक गुन्हा दाखल झाला. माझ्या विधानसभेची निवडणूक झाली. त्यानंतर मसवड पालिकेची निवडणूक होती. त्याच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर गुन्हा दाखल झाला. २०१९ साली या प्रकरणी निकाल लागला. निकालाची प्रत माझ्याकडे आहे. निकालामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि मोबाईल नष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने नष्ट करण्याचे आदेश दिले होते." असंही गोरे म्हणाले.

यावेळी गोरे यांनी विरोधकांवर टिका केली. गोरे म्हणाले, "कोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली. लोकशाहीत सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे. न्यायालयाच्या निकालाला सहा वर्षे झाली आहेत. सहा वर्षांनी हे प्रकरण समोर आलं आहे. कोणत्या वेळी काय बोलावं, याची मर्यादा राजकीय नेत्यांनी ठेवावी." असं गोरे म्हणाले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानं महायुतीला पहिला झटका बसला आहे. तर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. त्यातच मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपाने खळबळ उडाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT