Bajari Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Crop : बाजरी पिकाचा पीक पद्धतीत समावेश करावा

Millet Crop : बाजरीचे आहारातील महत्त्व समजून घेऊन या पिकाचा पीक पद्धतीत समावेश करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

Team Agrowon

Jalana News : बाजरीचे आहारातील महत्त्व समजून घेऊन या पिकाचा पीक पद्धतीत समावेश करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.

जालना जिल्ह्यातील वरुडी, ता. बदनापूर येथे बाजरी आध्यारेशा पीक प्रात्यक्षिकास त्यांनी नुकतीच भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगर यांच्यामार्फत वरुडी गावात व परिसरात १०० एकरांवर एचबी १२०० या संकरित वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले. या वेळी कुलगुरू डॉ. मनी म्हणाले, की २०२३ हे वर्ष अंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष असल्याकारणाने तृणधान्याचे व विषेशतः बाजरी पिकाचे आहारातील महत्त्व समजून घ्या.

हवामान बदलास अनुकूल, कमी पाण्यात, कमी खर्चात, बाजरी हे पीक घेता येते. तसेच या वाणामध्ये लोहाचे व जस्तचे प्रमाण अधिक असल्याने आहारात समावेश केल्यास लोहाचे प्रमाण वाढण्यास व प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.

भविष्यात अन्न सुरक्षाबरोबरच पौष्टिक सुरक्षा महत्त्वाची आहे, असेही ते म्हणाले. कुलगुरू यांनी शेतकऱ्यांच्या उपस्थित पिकांची पाहणी केली.

या वेळी सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. दीपक पाटील, डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. आशिष बागडे, शेतकरी जयकिशन शिंदे, हरिभाऊ शिंदे, कृष्णा शिंदे, बद्रीनाथ शिंदे व विद्यार्थी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT