Millet Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Excellence Center : श्री अन्न उत्कृष्टता केंद्र अखेरीस सोलापुरातच

Millet Center : कृषी प्रक्रिया उद्योगासंबंधी महत्त्वाचे असणारे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूर जिल्ह्यात उभारण्यास मान्यता देण्यात येऊनही नंतर ते अचानकपणे बारामतीला हलवण्यात आले.

सुदर्शन सुतार

Solapur News : कृषी प्रक्रिया उद्योगासंबंधी महत्त्वाचे असणारे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूर जिल्ह्यात उभारण्यास मान्यता देण्यात येऊनही नंतर ते अचानकपणे बारामतीला हलवण्यात आले. पण सोलापूरच्या वाट्याचे केंद्र अशा पद्धतीने बारामतीला पळविल्यावरून सोलापूर जिल्ह्यातील तीव्र नाराजी ओळखून राज्य सरकारने आता हा निर्णय पुन्हा बदलून श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापूरमध्येच स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी (ता. १३) घेतला.

जिल्ह्यात ज्वारीसह तृणधान्याखालील क्षेत्र इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. रब्बीचा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख असल्यानेच हे केंद्र सोलापूरसाठी मंजूर झाले होते. पण, पुणे जिल्ह्यात अत्यल्प क्षेत्र असतानाही हे केंद्र सोलापूरऐवजी बारामतीला स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विरोधकांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवर, मंत्री, लोकप्रतिनिधींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर या निर्णयाबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी हा निर्णय बदलण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यतः हे केंद्र अशा पद्धतीने पळवल्यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका निवडणुकीत बसू शकतो, विरोधक त्याचे भांडवल करतील, याची धास्ती सत्ताधाऱ्यांना होतीच.

या पार्श्वभूमीवर बारामतीला हलविलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होईल, असा नवीन आदेश शासनाला अखेरीस काढावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला नेण्याचा निर्णय झाला, पण ते पुन्हा आपल्याकडेच व्हावे यासाठी सतत पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून आता हे केंद्र सोलापुरातच होणार आहे. सोलापूरकरांसाठी हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांसह सर्वांचेच अभिनंदन.
- सुभाष देशमुख, आमदार, दक्षिण सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT