Millet Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Cultivation : सिंधुदुर्गमध्ये भरडधान्य लागवड अभियान राबविणार

Team Agrowon

Millet Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरडधान्य लागवड अभियान राबविण्याचा संकल्प किर्लोस विज्ञान केंद्राने केला असून यावर्षी पावसाळी आणि हिवाळी हंगामात ५० हेक्टरवर भरड धान्य लागवड करण्यात येणार असल्याची माहीती विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भास्कर काजरेकर यांनी दिली.

काजरेकर म्हणाले, की यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. भरडधान्यास ‘श्री’ अन्न म्हटले जाते. भरड धान्य पौष्टिक तृणधान्ये म्हणजे न्यूट्री सिरीयल्स म्हणूनदेखील ओळखली जातात. भरडधान्य ऊर्जा व पोषण तत्त्वांचे आगार आहेत.

ही धान्य पचायला हलकी असतात. जगाच्या अनेक भागांमध्ये भरडधान्य हे स्थानिक पीक आहे. भरड धान्याच्या जगातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक भरडधान्ये भारतात पिकवली जातात व निर्यात केली जातात.

कोकणात सुरुवातीच्या काळात भरडी उताराच्या डोंगराळ जमिनीत मोठ्या प्रमाणात नाचणी, वरई, हरिक व सावा या भरडधान्य पिकांची लागवड केली जायची. परंतु सध्याच्या काळामध्ये ही पिके दुर्लक्षित होत चालली असून या पिकांखालील क्षेत्र नगण्य आहे.

शेतकऱ्यांच्या दैनंदिन आहारामध्येसुद्धा याचे प्रमाण घटले आहे. म्हणून कृषी विज्ञान केंद्राद्वारे या वर्षीच्या पावसाळी व हिवाळी हंगामात ५० हेक्टर क्षेत्रावर नाचणी, वरी, हरिक व सावा या पिकांची लागवड केंद्राच्या व शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर करण्यात येणार आहे.

नाचणीमध्ये विशेष करून लाल रंगाची व पांढऱ्या रंगाचे नाचणी बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

तसेच दुर्लक्षित झालेली वरई व सावा या बियाण्यांची उपलब्धता केंद्राद्वारे करून लागवड तंत्रज्ञानविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भरडधान्य प्रक्रियेबाबत महिला बचत गटांना प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT